शुभमन गिल लॉर्ड्स मैदानावर रचणार नवा इतिहास

  • By admin
  • July 9, 2025
  • 0
  • 10 Views
Spread the love

द्रविड, कोहलीचा विक्रम मोडण्यासाठी गिलला १८ धावांची गरज

लंडन ः भारतीय संघाचा नवा कसोटी कर्णधार शुभमन गिल याच्या जबरदस्त फॉर्मची सध्या जगभरात चर्चा होत आहे. त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे इंग्लंड दौऱ्यावर त्याने फलंदाजी करताना केलेली जबरदस्त कामगिरी. शुभमन गिलने इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये १४६.२५ च्या सरासरीने ५८५ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने एक द्विशतक आणि २ शतकी डाव झळकावले आहेत. लॉर्ड्स मैदानावर खेळल्या जाणाऱ्या या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात गिलला आता नवा इतिहास रचण्याची संधी असेल.

शुभमन गिल १८ धावा करताच इतिहास रचेल
शुमन गिलला इंग्लंडविरुद्ध भारतीय खेळाडू म्हणून त्याच्या नावावर एक मोठा विक्रम करण्याची संधी असेल. इंग्लंड दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत आतापर्यंत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम राहुल द्रविडच्या नावावर आहे, त्याने २००२ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर ६ डावात १००.३३ च्या सरासरीने ६०२ धावा केल्या, ज्यामध्ये तीन शतके आणि एक अर्धशतक समाविष्ट होते. यानंतर, विराट कोहलीचे नाव यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने २०१८ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर १० डावात फलंदाजी करताना ५९.३० च्या सरासरीने ५९३ धावा केल्या. आता ५८५ धावांसह यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला गिल, लॉर्ड्स कसोटी सामन्यात फक्त १८ धावा करू शकला तर तो द्रविड आणि गांगुलीला मागे टाकू शकेल. इंग्लंड दौऱ्यावर

कर्णधार गिल पहिल्यांदाच लॉर्ड्स मैदानावर खेळणार
शुभमन गिलने आतापर्यंत त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत तिन्ही स्वरूपात लॉर्ड्स मैदानावर एकही सामना खेळलेला नाही, त्यामुळे त्याला या ऐतिहासिक मैदानावर पहिल्यांदाच खेळण्याची संधी मिळेल, जिथे खेळणे सर्व खेळाडूंचे स्वप्न असते. या सामन्यात, टीम इंडियाच्या प्लेइंग ११ मध्ये बदल होणे निश्चित आहे, ज्यामध्ये जसप्रीत बुमराह पुनरागमन करताना दिसेल.

कसोटी मालिकेत भारतासाठी सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

राहुल द्रविड – ६०२ धावा (२००२)

विराट कोहली – ५९३ धावा (२०१८)

शुभमन गिल – ५८५ धावा (२०२५)

सुनील गावसकर – ५४२ धावा (१९७९)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *