
परभणी ः राज्य वरिष्ठ सेपक टकरा स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर संघाने विजेतेपद पटकावले. परभणी संघ उपविजेता ठरला.
महाराष्ट्र सेपक टकारा असोसिएशन व नाशिक जिल्हा असोसिएशन वतीने ३५ वी वरीष्ठ गट राज्य सेपक टकरा स्पर्धा नाशिक येथे विभागीय क्रीडा संकुलात संपन्न झाली. या स्पर्धेत स्कॉड प्रकारात छत्रपती संभाजीनगर संघाने विजेतेपद संपादन केले. परभणी संघ उपविजेता ठरला. तृतीय क्रमांक बीड आणि वाशिम जिल्हा संघाने संपादन केले.
अंतिम सामना छत्रपती संभाजीनगर आणि परभणी यांच्यात झाला. छत्रपती संभाजीनगर संघाने २-१ सेटने विजय साकारत विजेतेपद संपादन केले. परभणी संघ उपविजेता ठरला.
परभणी जिल्हा स्कॉड संघात विजय चौधरी, निलेश बानाटे, साई पोफळे, रामराव कांदे, निलेश काळके, पांडुरंग केंद्रे यांचा समावेश आहे. संघ प्रशिक्षक म्हणून कैलास टेहरे यांनी काम पाहिले.
राज्य स्पर्धेतील यशाबद्दल राज्य अध्यक्ष विपीन कामदार, राज्य सरचिटणीस डॉ योगेंद्र पांडे, जिल्हा अध्यक्ष आमदार राजेश विटेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे, नितीन लोहट, राजेंद्र मुंढे, मोहम्मद इकबाल, बाबासाहेब राखे, गणेश माळवे, डॉ अमृता पांडे, डॉ विनय मून, डॉ परवेज खान, मनोज बनकर, सज्जन जैस्वाल, प्रशांत नाईक, अब्दुल अन्सार यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.