
अमरावती (डॉ तुषार देशमुख) ः नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय सीनियर सेपक टकरा स्पर्धेत अमरावती महिला संघाने उपविजेतेपद संपादन केले.
राज्यस्तरीय सीनियर सेपक टकरा स्पर्धा नुकतीच नाशिक येथील विभागीय क्रीडा संकुल येथे संपन्न झाली. या स्पर्धेत राज्यातील मुला-मुलींचे संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी राज्य सेपक टाकरा संघटनेचे महासचिव डॉ योगेंद्र पांडे, उपाध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्राचार्य डॉ हनुमंत लुंगे, डॉ विनय मून आदी प्रामुख्याने उपस्थित होते. बक्षीस वितरण सोहळा कार्यक्रमास महाराष्ट्र सेपक टकरा संघटनेचे महासचिव डॉ योगेंद्र पांडे, उपाध्यक्ष डॉ हनुमंत लुंगे, डॉ विनय मून आणि सर्व जिल्हा संघटनेचे सचिव यांची उपस्थिती होती.
अमरावती महिला संघाने राज्य अजिंक्यपद सेपक टकरा स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. अमरावती संघाने पुणे, नागपूर, जळगाव, मुंबई, नांदेड व सोलापूर या बलाढ्य संघांचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली होती. अंतिम फेरीत नाशिक संघासोबत झालेल्या चुरशीच्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आणि उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
या संघांचे प्रशिक्षक प्राचार्य डॉ हनुमंत लुंगे होते तर व्यवस्थापक म्हणून एकता चौधरी हिने काम बघितले. या संघामध्ये भक्ती गजानन चौधरी, आयुषी धर्मेंद्र दिवाण, जेशिका प्रमोद काळे, माही रमेश नागदिवे, तृष्णा अजय आगळेकर, अंशिका महेंद्र दिवाण, श्रावणी आशिष लोणारे, अंजली उमेश राठोड, नॅन्सी नरेंद्र जैस्वाल, अक्षरा अजय तायवडे, आरुषी अतुल शिंगाडे, आरती संजय मारसकोल्हे, मानसी सुगंध बंड, ईशा विजय काळे यांचा समावेश होता.
या संघांचे जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, संघटनेचे उपाध्यक्ष डॉ सुगंध बंड, डॉ हरीश काळे, आनंद उईके, मुख्याध्यापिका अर्चना लुंगे, डॉ तुषार देशमुख, अतुल पडोळे, हेमंत देशमुख, प्रफुल गाभने, डॉ सुनील कुमार यांनी अभिनंदन केले आहे.