
नाशिक ः अस्थाना कझाकिस्थान येथे झालेल्या एशियन ज्युनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या साईराज राजेश परदेशी याने स्नॅच प्रकारात १५२ किलो व क्लीन जर्क प्रकारात १८६ किलो ३३८ किलो वजन उचलून चुरशीच्या लढतीत तीन कांस्यपदके पटकावली.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात या कार्यक्रमात साईराज परदेशी याचा गौरव केला होता. साईराज याने पुन्हा एकदा आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
साईराज परदेशीला वेटलिफ्टिंग प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर, भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे आलोकेश बरवा, डी डी शर्मा यांचे मार्गदर्शन लाभले आहे. महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव संतोष सिंहासने, अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी साईराजचे अभिनंदन केले आहे.