
नाशिक ः मनमाड येथील छत्रे विद्यालयात दहावी इयत्तेत शिकणारी जय भवानी व्यायामशाळेची उदयोन्मुख खेळाडू आनंदी विनोद सांगळे हिची भारतीय वेटलिफ्टिंग संघाच्या प्रशिक्षण शिबिरासाठी निवड करण्यात आली आहे.
पतियाळा (पंजाब) येथे भारतीय संघाचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले असून त्यातून आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघ निवडला जाणार आहे.
आनंदीला वेटलिफ्टिंग प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव संतोष सिंहासने, अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी आनंदीचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.