
मुंबई ः परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज सेवा ट्रस्ट कमला नेहरू पार्क, मलबार हिल, मुंबई येथे आयोजित गुरुपौर्णिमा उत्सव सोहळ्यात बीपीसीएच्या शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ घनश्याम ढोकरट यांना उत्कृष्ट प्राचार्य पुरस्काराने गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाअंतर्गत विविध महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आला. तसेच शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले. एनजीसीचे अध्यक्ष डॉ टी ए शिवारे, बीपीसीएचे अध्यक्ष संजय शेटे, बीपीसीएचे सचिव दीपक शेटे व आयोजक संजय शिर्के यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.