
नागपूर ः नाशिक येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत नागपूरच्या खेळाडूंनी दोन कांस्य पदकांची कमाई केली.
१७ वी मिनी राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धा नाशिक येथे नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेत नागपूर तलवारबाजी संघटनेच्या तलवारबाजांनी महाराष्ट्राच्या वतीने खेळताना उत्कृष्ट कामगिरी बजावली. काव्या गजानन शिर्के (फॉइल इव्हेंट) आणि ईशा वैभव खडतकर (ईपी इव्हेंट) यांनी अंडर १२ मध्ये खेळताना कांस्यपदके जिंकली. महाराष्ट्राच्या वतीने खेळताना दोन्ही खेळाडूंनी महाराष्ट्र आणि नागपूर जिल्ह्याचे नाव उंचावले. पदक विजेत्या खेळाडूंनी त्यांच्या यशाचे श्रेय प्रशिक्षक सागर भगत आणि त्यांच्या पालकांना दिले.
राष्ट्रीय स्पर्धेत पदक जिंकल्याबद्दल नागपूर जिल्हा तलवारबाजी संघटनेचे सचिव मोहम्मद शोएब आणि अध्यक्ष अजय सोनटक्के आणि अंकित गजभिये, नंदकुणाल, आवेश सोमकुंवर, राहुल मांडवकर, यश सोनटक्के, आकाश ठाकरे यांनी त्यांचे अभिनंदन केले.