
लांब उडीत श्रीशंकरला प्रथम क्रमांक, साक्षी चव्हाणने पटकावले सुवर्णपदक
पुणे : महाराष्ट्र राज्य अॅथलेटिक्स संघटनेच्या वतीने आयोजित भारतीय खुल्या अॅथलेटिक्स स्पर्धेत पुरुष गटात महाराष्ट्राच्या हर्ष राऊतने १०.३८ सेकंदाची वेळ नोंदवून वेगवान धावपटू असा बहुमान संपादन केला. तर, महिला गटात रिलायन्स स्पोर्ट्स फाउंडेशनच्या साक्षी चव्हाण हिने ११.८१ वेळेची नोंद केली. भारताचा अव्वल आंतरराष्ट्रीय लांब उडी पटू जे एस डब्ल्यूच्या श्रीशंकर एम याने आपल्या चौथ्या उडीत ८.०५ मीटर अंतर कापून लांब उडीत प्रथम क्रमांक पटकावला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अॅथलेटिक्स ट्रॅकवर झालेल्या या एकदिवसीय स्पर्धेत पुरुषांच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत मूळचा ठाण्याचा असलेला हर्ष राऊत (१०.३८ से) याने प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर ओडिशाच्या आमिया कुमार मल्लिक याने १०.६३ से, तर, महाराष्ट्राच्या विनीत दिनकरने (१०.६८ से) यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला.

महिला गटात चुरशीच्या लढतीत मूळची छत्रपती संभाजीनगर येथे असलेली आणि रिलायन्स स्पोर्ट्स फाउंडेशन अंतर्गत साक्षी चव्हाण हिने ११.८१ सेकंद वेळ नोंदवत पहिला क्रमांक पटकावला. मूळची साताराची असलेली त्रिवेंद्रम येथे एनसीओई येथे कार्यरत असलेल्या राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती असलेली सुदेशना शिवणकरने ११.८९ सेकंद आणि महाराष्ट्राच्या राष्ट्रीय विजेत्या अवंतिका नराळे (११.९३ से) हिने अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान पटकावले.
दुपारच्या सत्रात लांब उडी प्रकारात पुरुष गटात ओडिशाच्या सरून पायासिंग (७.६८ मी) याने दुसरा आणि केरळच्या अमल टीपी (७.४५ मी) याने तिसरा क्रमांक पटकावला.
अंतिम निकाल
१०० मीटर धावणे : महिला गट – १. साक्षी चव्हाण, २. सुदेशना शिवणकर, ३. अवंतिका नराळे.
१०० मीटर धावणे : १. चार्वी पुजारी, २. तमश्री मिश्रा, ३. सिया सावंत.
१०० मीटर धावणे : पुरुष गट अ : १. अमिया मल्लिक, २. विक्रम गुर्जर, ३. प्रज्वल आर.
१०० मीटर धावणे पुरुष शर्यत ब : १. मनीष कुमार, २. अबिनाश साहू, ३. आर्यन फ्रान्सिस.
१०० मीटर धावणे पुरुष शर्यत क : १. नयन शहा, २. क्षितिज चांगिरे, ३. ऋषी हजारिका.
१०० मीटर धावणे पुरुष शर्यत ड : १. विनीत दिनकर, २. रोहन घोष, ३. आर्यन कदम.
१०० मीटर धावणे पुरुष शर्यत इ : १. हर्ष राऊत, २. धीरज श्रीधर, ३. पाल धन सिंग.
४०० मीटर धावणे पुरुष शर्यत अ : १. निखिल ढाके, २. सुरेश पुनिया, ३. विश्वजीत शिंदे.
४०० मीटर धावणे पुरुष शर्यत ब : १. सुभाष दास, २. गगन आमिन, ३. सुनील पुरोहित.
४०० मीटर धावणे पुरुष शर्यत क : १. आमोज जेकब, २. संतोष कुमार टी, ३. सुरज ए.
४०० मीटर धावणे पुरुष शर्यत ड :१. विशाल टी के, २. जय कुमार, ३. अरुल राज लिंगम.
४०० मीटर पुरुष अडथळा शर्यत अ : १. निकुंज झाला, २. आर्यन कश्या, ३. रक्षित एन.
४०० मीटर पुरुष अडथळा शर्यत ब : १. कार्तिक यारावरपू, २. शक्ती सिंग, ३. कैफ इलाही.
४०० मीटर पुरुष अडथळा शर्यत क : १. अश्विन कृष्णन एल, २. तेजप्रताप सिंग, ३. केशव तन्वर.
४०० मीटर पुरुष अडथळा शर्यत ड : १. सतीश के, २. आफताब आलम, ३. हरदीप कुमार.
८०० मीटर धावणे पुरुष शर्यत अ : १. अखिल केए, २. तुषार सूर्यवंशी, ३. अनंत गौतम.
८०० मीटर धावणे पुरुष शर्यत ब : १. क्रिशन कुमार, २. सत्यजीत पूजा, ३. नकुल गोडसे.
८०० मीटर धावणे महिला : १. लकमीप्रिया किसन, २. विनिता गुर्जर, ३. वैष्णवी रावळ.
४०० मीटर अडथळा शर्यत महिला गट : १. दिक्षिता रामकृष्ण, २. रमणदीप कौर, ३. श्रावणी सांगळे.
थाळीफेक पुरुष गट : १. भरतप्रीत सिंग, २. मोहम्मद एएच, ३. प्रवीण कुमार.
थाळीफेक महिला गट : १. मुकेश कुमारी, २. भक्ती गावडे, ३. केएम मधु वर्मा.
लांब उडी महिला गट : १. मनिषा मेरेल, २. अनन्या सिंग, ३. गायत्री कास.
लांब उडी पुरुष गट : १. श्रीशंकर एम, २. सरून पायासिंग, ३. अमल टीपी.
महिला उंच उडी : १. प्राची, २. सीमा कुमारी, ३. साक्षी पारित.
भालाफेक पुरुष गट : १. शिवम लोहकरे, २. शशांक पाटील, ३. आनंद सिंग.
५००० मीटर धावणे पुरुष गट : १. मृणाल सरोदे, २. धर्मेंदर, ३. हरमनजोत सिंग.
५००० मीटर धावणे महिला गट : १. रविना गायकवाड, २. सुप्रिती कच्चप, ३. संघमित्रा महत्ता.