
छत्रपती संभाजीनगर ः सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत गुरुकुलऑलिम्पियाड स्कूलच्या मुलींच्या संघाने अंडर १७ वर्षांखालील गटात कांस्य पदक जिंकले आहे. या स्पर्धेत ईशा पालकर हिने उत्कृष्ट कामगिरी नोंदवत एकूण आठ गोल नोंदवले हे विशेष.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गुरुकुल ऑलिम्पियाड स्कूल संघाने वूडरिज स्कूल संघाचा २-१ असा पराभव करुन कांस्य पदक पटकावले.
कांस्य पदक विजेत्या गुरुकुल ऑलिम्पियाड स्कूल संघात ईशा पालकर, तनिष्का राजपूत, श्रिया दंडवते, काव्या चौधरी, श्रेया जावकर, ईश्वरी बीडकर, काव्या भिंगारे, वैष्णवी नांगलोट, रसलिंग महल, शर्वरी पांढरे, मुग्धा अरगडे, भक्ती हरेर, सानवी काळदाते, उत्कर्षा काळुंखे, विभा शेट्टी, समृद्धी बजाज, संस्कृती दाभाडे या खेळाडूंचा समावेश आहे.
या शानदार कामगिरीबद्दल गुरुकुल ऑलिम्पियाड स्कूलचे मुख्य मार्गदर्शक सतीश तांबट, मार्गदर्शक गणेश साळुंके आणि रक्षावदा तांबट यांनी संघाचे अभिनंदन केले. क्रीडा विभाग प्रमुख अविनाश कोळेश्वर आणि पियुष हटकर यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले आहे.