
पुणे ः अजय कोठावळे, सतीश कुलकर्णी व सारिका वर्दे या पुण्याच्या खेळाडूंनी नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रौढांच्या पहिल्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील आपापल्या गटात विजेतेपदावर मोहोर नोंदवली.

ही स्पर्धा नवी मुंबई येथील एलीसीयम क्लब येथे टीटीसी पालव यांनी आयोजित केली होती. प्रौढांच्या साठ वर्षावरील गटात कोठावळे यांनी अंतिम लढतीत संजय मेहता (टी एस टी) यांच्यावर ११-८,९-११,११-४,११-६ अशी मात केली. उपांत्य फेरीत त्यांनी पुण्याच्याच पराग जुवेकर यांचा पराभव केला होता. ७५ वर्षावरील वयोगटात सतीश कुलकर्णी हे विजेतेपदाचे मानकरी ठरले. अंतिम सामन्यात त्यांनी रवींद्र बोरकर (टी एस टी) यांच्यावर ११-५,७-११,११-६,९-११,११-५ असा संघर्षपूर्ण विजय मिळविला.
महिलांच्या ४० वर्षावरील गटात वर्दे यांनी विजेतेपद मिळवताना सादिया वंजारी (मुंबई महानगर जिल्हा) यांचा पराभव केला. हा सामना अतिशय रंगतदार झाला. त्यांनी या सामन्यात १०-१२,११-४,११-८,७-११,११-६ असा विजय मिळविला.

स्पर्धेतील अंतिम फेरीचे अन्य निकाल
पुरुष ६५ वर्षावरील – उमेश कुंभोजकर विजयी विरुद्ध जयंत कुलकर्णी १६-१८,११-९,११-८, ११-३. ७० वर्षावरील गट – पर्सी मेहता विजयी विरुद्ध योगेश देसाई ५-११,११-७,८-११,११-९,११-९. ८० वर्षावरील गट – सतीश शिरसाट विजयी विरुद्ध सुबोध नार्वेकर १२-१०,६-११,११-९,८-११,११-६.
महिला ५० वर्षांवरील गट – मुनमुन मुखर्जी विजयी विरुद्ध सुषमा मोगरे ११-१,११-४,११-३. ५५ वर्षावरील गट – डॉ अनघा जोशी विजयी विरुद्ध तृप्ती माचवे ११-६,९-११,११-३,११-४. ६० वर्षावरील गट – मनीषा प्रधान विजयी विरुद्ध स्वाती आघारकर ११-९,११-८,११-९. ६५ वर्षांवरील गट – राजेश्वरी म्हेत्रे विजयी विरुद्ध मैथिली सोधी ८-११,११-८,११-९,११-५.