
पहिल्या फक्त ८ संघांना प्रवेश
जळगाव ः खेलो इंडियातर्फे फुटबॉल या खेळासाठी अस्मिता फाउंडेशनच्या माध्यमातून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असून महाराष्ट्रात ८ ठिकाणी एक दिवसीय नाकाऊट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जळगाव शहराला देखील ही संधी प्राप्त झालेली आहे. ही स्पर्धा १० ऑगस्ट रोजी जळगाव येथे होत आहे.
या स्पर्धेसाठी प्रवेशासाठी पात्रता जी शाळा अथवा क्लबमध्ये २० मुलींचा संघ असेल व त्या संघातील खेळाडूंची जन्मतारीख १/१/२०१२ ते ३१/१२/२०१४ च्या आत असेल अशाच खेळाडूंना यात सहभागी होता येईल. २० खेळाडूंची सीआरएसमध्ये नोंदणी करणे आवश्यक राहील.
प्रवेशासाठी अंतिम मुदत २० जुलै
ज्या संघांना, शाळांना या स्पर्धेत सहभागी व्हायचे असेल त्यांनी त्वरित आपल्या २० खेळाडूंच्या नावांच्या यादीसह तसेच त्यांच्या जन्म प्रमाणपत्र व आधार कार्डसह जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव फारुक शेख (८८८८०२५७८६) किंवा कार्याध्यक्ष डॉ अनिता कोल्हे (९८५०६०१८८१) यांच्याशी त्वरित संपर्क साधावा. कारण फक्त आठ संघांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे याची कृपया नोंद घ्यावी. सदर स्पर्धेत त्वरित सहभागी व्हावे असे आवाहन जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर उल्हास पाटील यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.