
राज्य युनिफाईट अजिंक्यपद स्पर्धा ः सोलापूरला तृतीय स्थान
सोलापूर ः १२व्या राज्यस्तरीय युनिफाईट अजिंक्यपद स्पर्धेत रायगड जिल्हा संघाने विजेतेपद पटकावले. ठाणे जिल्हा संघाने उपविजेतेपद संपादन केले. सोलापूर जिल्हा संघाने तृतीय क्रमांक मिळवला.
भारतीय शालेय क्रीडा महासंघ मान्यता प्राप्त भारतीय युनिफाईट महासंघाच्या मान्यतेने महाराष्ट्र युनिफाईट वेल्फेअर असोसिएशन व सोलापूर जिल्हा युनिफाईट वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा सिंहगड इन्स्टिट्यूट केगाव येथे झाली. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोलापूर शहर भाजपा अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्य युनिफाईट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष खंदारे, महासचिव मंदार पनवेलकर, जिल्हा युनिफाईट संघटनेचे सचिव भीमराव बाळगे, खजिनदार इक्बाल शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.
विजयी खेळाडूंना प्रथम द्वितीय व तृतीय याप्रमाणे सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकाचे तसेच प्राविण्य प्राप्त व सहभाग प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत मनोज बाळगे, प्रचिता जोगदांडे, पौर्णिमा पुजारी यांनी केले. सब-ज्युनियर, ज्युनिअर व सिनियर गटात विविध वजन व वयोगटातून प्रथम क्रमांक प्राप्त मुले-मुली खेळाडूंची निवड राष्ट्रीय युनिफाईट अजिंक्यपद स्पर्धेसाठी झाली आहे.
विजयी खेळाडूंचे जिल्हा युनिफाईट संघटनेचे अध्यक्ष महेश इंगळे, जिल्हा किक बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष महादेव चाकोते, राज्य किक बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष मनीष सुरवसे राज्य सिकई संघटनेचे सदस्य शिवकुमार पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार व क्रीडा अधिकारी सत्येन जाधव यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
सोलापूरचे पदक विजेते खेळाडू
सुवर्ण – ऋतुजा वेदपाठक, राजवीर जाधव, काव्यल टोंगाळी, अर्नव नन्नो, अवनी जाधव, गौरी हिरकणी, अथर्व गायकवाड, समर्थ बागेवाडी, दिया लोकोटिया, अथर्व मडगुंडे, सोहम सागर, सायमन रॉय, सिद्धार्थ चिंचोळी, अर्नव बाचन, दिग्वस बिराजदार, साईराज महिंद्रकर, मोहिनी नरवणे, वांशिक माळी, वेदिका श्रीचिप्पा, श्रुती मोटे, संस्कृती अंजीखाने, पौर्णिमा पूजारी, संगमेश्वर शिराळकर, रिया तांबोळी.
रौप्यपदक – आरुष राळेकर, वेदिका परदेशी, रश्मी पाटील, शौर्य दूधगुंडी, अर्चना परदेशी, अष्टम भाऊन, आदित्य गोलसाव, अथर्व मच्छो, श्रावणी लांबजने, मानसी टांगसाळी, श्रावणी डांगे, अनुष्का माळवदे, जिक्रा शेख, संस्कृती सातपुते, जुनैरा खान, तनिषा हट्टार, श्रवण वालिकर.