
परभणी ः क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद परभणी, महानगरपालिका परभणी शहर आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजन आढावा बैठक बी रघुनाथ सभागृहात येथे १८ जुलै रोजी संपन्न झाली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे या होत्या. या प्रसंगी मंचावर महानगरपालिका परभणी शहर क्रीडा अधिकारी राजकुमार जाधव, शारीरिक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष रणजित काकडे, जिल्हा क्रीडा संकुल समिती नवनियुक्त सदस्य गणेश माळवे, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे हे उपस्थित होते.

या बैठकीत जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन आणि नियोजन तसेच ऑनलाईन संदर्भात येणाऱ्या अडचणी याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच तालुकास्तरीय स्पर्धेत येणाऱ्या अडचणींबद्दल तालुका संयोजकांनी आपले मत मांडले. तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी क्रीडा साहित्य उपलब्ध करून द्यावे जेणेकरून खेळाडूंना त्याचा फायदा होईल.
२०२६-२६ शैक्षणिक वर्षात घेण्यात येणाऱ्या विभाग स्तरीय तसेच राज्यस्तरीय स्पर्धेबद्दलच्या आयोजनाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे यांनी मार्गदर्शन केले. तसेच ऑनलाईन पोर्टलद्वारे येणाऱ्या अडचणींना सविस्तर उत्तर दिले. सर्व जिल्हातील प्रत्येक शाळेने शालेय जिल्हा क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आहवान केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा अधिकारी सुयश नाटकर यांनी केले. सूत्रसंचालन किशोर ढोके यांनी केले. रोहन औढेकर यांनी आभार मानले.
ही बैठक यशस्वी करण्यासाठी तालुका क्रीडा संयोजक तुकाराम शेळके (पाथरी), प्रशांत नाईक (सेलू), किशन भिसे (मानवत), दिलीप चव्हाण (जिंतूर), धर्मसिंग बायस (पूर्णा), शिवाजी तळेकर (सोनपेठ), विलास राठोड (गंगाखेड), मोतीराम शिंदे (पालम), प्रकाश पंडित, धीरज नाईकवाडे, योगेश आदमे आदींनी परिश्रम घेतले.