
भारतीय खेळाडूंनी खेळण्यास नकार दिल्यानंतर आयोजन समितीचा मोठा निर्णय
एजबॅस्टन ः वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्सचा दुसरा सीझन १८ जुलै रोजी सुरू झाला. या स्पर्धेत एजबॅस्टन मैदानावर रविवारी इंडिया चॅम्पियन आणि पाकिस्तान चॅम्पियन यांच्यातील सामना खेळवण्यात येणार होता. या सामन्याबाबत भारतीय चाहत्यांकडून बरीच टीका झाली होती. त्यानंतर आता स्पर्धेच्या आयोजन समितीने सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. इंडिया चॅम्पियन्स संघाचा भाग असलेले हरभजन सिंग, शिखर धवन, युसूफ पठाण आणि इरफान पठाण यांनी आधीच सामन्यात खेळण्यास नकार दिला होता.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध खूप बिघडत आहेत, ज्याचा परिणाम प्रत्येक क्षेत्रात दिसून येत आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्सच्या दुसऱ्या सीझनमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबद्दल आधीच बरीच टीका झाली होती. त्यानंतर शिखर धवनने आधीच स्पर्धा खेळताना आपली संमती देऊन पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात न खेळण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय हरभजन सिंगने सामन्याच्या एक दिवस आधी सामन्यात न खेळण्याची माहिती दिली. आता या निषेधाच्या पार्श्वभूमीवर, स्पर्धा आयोजन समितीला सामना रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला, ज्याची माहिती त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून दिली आहे.
स्पर्धेत एकूण ६ संघ सहभागी
डब्ल्यूसीएल स्पर्धेत एकूण ६ संघ सहभागी होत आहेत. त्यामध्ये भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ समाविष्ट आहेत. सर्व संघांमध्ये अनेक दिग्गज माजी खेळाडू मैदानात परतत आहेत. पाकिस्तान चॅम्पियन्स विरुद्धचा सामना रद्द झाल्यानंतर, आता इंडिया चॅम्पियन्स संघ २२ जुलै रोजी नॉर्थम्प्टन येथील काउंटी ग्राउंडवर दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स विरुद्ध स्पर्धेतील त्यांचा पुढील सामना खेळेल, ज्यामध्ये हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ५ वाजता सुरू होईल.
भारत चॅम्पियन्स संघ : युवराज सिंग (कर्णधार), शिखर धवन, रॉबिन उथप्पा (यष्टीरक्षक), अंबाती रायुडू, गुरकीरत सिंग मान, सुरेश रैना, युसूफ पठाण, इरफान पठाण, स्टुअर्ट बिन्नी, विनय कुमार, हरभजन सिंग, पियुष चावला, सिद्धिमान कमान, अंबाती रायुडू, विनय कुमार, हरभजन सिंग.