
१७ पदकांची कमाई करत पटकावले विजेतेपद
जळगाव ः सीआयएससीई बोर्डच्या एच झोनलच्या तायक्वांदो स्पर्धेत जळगावच्या अनुभूती निवासी स्कूल संधाने वर्चस्व गाजविले. यात १३ सुवर्ण तर ४ रौप्य पदकांसह अनुभूती स्कूल संघाने विजेतेपद पटकावले.
अनुभूती निवासी स्कूल येथे पार पडलेल्या १४, १७ व १९ वर्षांआतील मुले आणि मुलींच्या या स्पर्धेचे उद्घाटन मॅट पूजनाने झाले. याप्रसंगी अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा अनिल जैन, प्राचार्य देबासिस दास, जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अरविंद देशपांडे, जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे सदस्य रविंद्र धर्माधिकारी, महाराष्ट्र तायक्वांदो असोसिएशनचे सदस्य अजित घारगे, प्रशिक्षक जयेश बाविस्कर, स्मिता बाविस्कर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थित विजयी खेळाडूंना पदक देऊन सन्मानित करण्यात आले. सदरील स्पर्धा या सेन्सर सिस्टीम्सवर घेण्यात आली.
अशोका युनिव्हर्सल स्कूल नाशिक, केब्रिंज स्कूल, आर. जे. इंटरनॅशनल स्कूल, बारनेस स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, अनुभूती स्कूल जळगाव, रयान इंटरनॅशनल स्कूल, पोदार इंटरनॅशनल स्कूल या स्कूलमधील सात संघाच्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
१४ वर्षाखालील मुलांच्या गटातील ३२ किलोखालील वयोगटात धनराज विभूते (केब्रिंज स्कूल), ४१ किलो वजनगटात देवेश (आर. जे. इंटरनॅशनल स्कूल) याने सुवर्णपदक पटकावले. ४१ किलो वरील वजन गटात स्वर्णीम सराफ याने सुवर्ण, श्लोक टाक याने रौप्य पदक प्राप्त केले.
मुलींच्या गटामध्ये १४ वर्षांखालील २९ किलो वजनगटात आरल कासारा (बारनेस स्कूल) सुवर्णपदक, ३२ किलो वजन गटात साधना देशमुख (अनुभूती स्कूल) सुवर्णपदक, प्रेरणा माटे (केब्रिंज स्कूल) रौप्य पदक, ३८ किलो वजन गटात शर्वरी हंडोरे (अशोका स्कूल) सुवर्ण पदक, भूमी धर्मशाली (अनुभूती स्कूल) रौप्य पदक, ३८ किलो वजन गटावरील गटात प्रत्युशा राठोड (केंब्रिज स्कूल) सुवर्णपदक, अनुभूती चौधरी (अनुभूती स्कूल) रौप्य पदक, देशना भन्सल (केब्रिंज स्कूल) कांस्यपदक प्राप्त केले.
१७ वर्षा खालील वयोगटात साची पाटील, समीक्षा पवार (अनुभूती स्कूल) सुवर्ण पदक, अक्षरा गडाख (अशोका स्कूल) रौप्य पदक, लावण्या बेडसे (पोदार स्कूल) सुवर्ण, किंजल धर्मशाली (अनुभूती स्कूल) रौप्य पदक, ४९ किलो वजन गटाखालील गटात भाविका पाटील (अनुभूती स्कूल) सुवर्ण, ५२ किलो वजन गटाखालील विर्ती बेदमुथा (रयान स्कूल) सुवर्ण पदक, भव्या अग्रवाल (अनुभूती स्कूल) रौप्य पदक, ५५ किलो खालील वजन गटात दिया देशपांडे (अनुभूती स्कूल) सुवर्ण, ५९ किलो खालील वजन गटात जान्हवी जैस्वाल (अनुभूती स्कूल) सुवर्ण, ६३ किलो खालील वजन गटात शाहिनी जैन (अनुभूती स्कूल) सुवर्ण, ६८ किलो खालील वजन गटात आदिती कुकरेजा (अनुभूती स्कूल) सुवर्ण, ६१ किलोवरील वजनगटात हिमांशी राठोड (केंब्रिज स्कूल) सुवर्ण पदक जिंकले.
१९ वर्षाखालील वयोगटात ४२ किलो खालील वजनगटात मुक्ती ओसवाल (अनुभूती स्कूल) सुवर्ण, ४९ किलो खालील वजनगटात समृद्धी कुकरेजा (अनुभूती स्कूल) सुवर्ण, ६३ किलो वजन गटाखालील पलक सुराणा (अनुभूती स्कूल) सुवर्णपदक, ६८ किलो वजनगटात अलफेया शाकिर (अनुभूती स्कूल) सुवर्ण पदक, ६८ किलो वरील गटात स्पर्श मोहिते (अनुभूती स्कूल) सुवर्ण पदक प्राप्त केले.
मुख्य पंच म्हणून स्मिता बाविस्कर, श्रेयांग खेकारे, पुष्पक महाजन यांनी काम पाहिले. अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा यशस्वीतेसाठी अनुभूती स्कूल, जैन स्पोर्ट्स अॅकडमी व जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. पलक सुराणा हिने सूत्रसंचालन केले.