
देवगिरी महाविद्यालयात मुंबईच्या एफआरएसटी फाऊंडेशनचा उपक्रम
छत्रपती संभाजीनगर ः देवगिरी महाविद्यालयात दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी एफआरएसटी फाउंडेशन मुंबईच्या वतीने उच्च दृश्य मानता रिफ्लेक्टिव्ह जॅकेट आणि रेनकोटचे यांचे वितरण करण्यात आले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे फाउंडेशन संस्थापक अभिनेत्री फराह नाज, फतेह रंधवा, रिकीन सहेगल, अदिती कथापालिया उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या प्रारंभी फतेह रंधवा यांनी भूमिका विशद करताना भारतामध्ये साडेतीन कोटी लोक अंध आहेत. या सर्वांना विविध गोष्टींचा सामना करत आपले जीवन जगावे लागते. त्यापैकी अनेक जण अपघातात मृत्यूमुखी पावतात ही गोष्ट वेदनादायक आहे. अंध आणि कमी दृष्टी असलेल्या बांधवांसाठी एफआरएसटी फाउंडेशन यांनी संशोधन करून विद्यार्थ्यांसाठी उच्च दृश्य मानता परावर्तक जॅकेट आणि रेनकोटची निर्मिती करण्यात आली आहे.
या अंध विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी या जॅकेटची निर्मिती करण्यात आली आहे. सामाजिक दायित्वाचा भाग म्हणून एफआरएसटी मुंबई फाउंडेशन देशभरात अशा प्रकारच्या सुरक्षा जॅकेट आणि रेनकोटचे वितरण अंध विद्यार्थ्यांना करत आहे. आजच्या या कार्यक्रमांमध्ये एकूण ९० विद्यार्थ्यांना सुरक्षा रेनकोट, सुरक्षा जॅकेट वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक तेजनकर हे होते. अध्यक्षीय मनोगतामध्ये देवगिरी महाविद्यालय सातत्याने अंध विद्यार्थ्यांसाठी विशेष सोयीसुविधा उपलब्ध करून देत असते. देवगिरी महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये विद्यार्थ्यांना अनेक अभ्यास उपयोगी सॉफ्टवेअर, ऑडिओ अभ्यास साहित्य, ब्रेल लिपीतील पुस्तके, संगणक सुविधा तसेच या सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयात मोफत प्रवेश दिला जातो. आज देवगिरी महाविद्यालयातील माजी अंध विद्यार्थी विविध सेवा क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत असे मत व्यक्त केले.
या प्रसंगी उपप्राचार्य डॉ रवी पाटील, डॉ अपर्णा तावरे, डॉ गणेश मोहिते, ग्रंथपाल डॉ सुरेश डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ सुदेश डोंगरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ वीणा माळी यांनी केले. अंध विद्यार्थिनी ऋतुजा ओझरकर यांनी आभार मानले.