
बुद्धिबळ स्पर्धेत मध्य प्रदेशच्या देवेंद्र परमारला उपविजेतेपद
अहिल्यानगर ः अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने आयोजित दुसऱ्या नरेंद्र फिरोदिया चषक बुद्धिबळ स्पर्धेत पुण्याचा प्रशांत सोमवंशी याने विजेतेपद पटकावले तर मध्य प्रदेशचा देवेंद्र परमार हा उपविजेता ठरला.
शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या विजेत्यांना जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र ट्रॉफी व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पाच लाख रुपये रोख रक्कम प्रोत्साहन म्हणून देण्यात आली. यावेळी जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट, खजिनदार सुबोध ठोंबरे, विश्वस्त श्याम कांबळे, पारुनाथ ढोकळे, प्रकाश गुजराथी, नवनीत कोठारी, दत्ता घाडगे, स्वप्निल बहगुरकर, सुनील जोशी, संजय खडके, स्पर्धेचे प्रमुख पंच प्रवीण ठाकरे, पवन राठी, शार्दुल टापसे, अमरीश जोशी, सनी गुगळे, शिशीर इंदुरकर, देवेंद्र ढोकळे, प्रशांत धंगेकर, गोरक्षनाथ पुंड, चेतन कड, मनीष जसवानी, विष्णू कुद्रे, अनुराधा बापट, शुभदा ठोंबरे, रोहिणी आडकर, डॉ स्मिता वाघ आदींसह खेळाडू, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले. या स्पर्धेला १८ राज्यातून व महाराष्ट्रातील २८ जिल्ह्यातून बुद्धिबळ खेळाडू सहभागी होते. सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडवले. अनेक
रोमहर्षक व उत्कंठा पूर्ण डाव बुद्धिबळ चाहत्यांना पाहता आले. या स्पर्धेत २०० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडू सहभागी झाले होते. ही या स्पर्धेच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. आपल्या भाषणात नरेंद्र फिरोदिया यांनी सांगितले की, जिल्ह्यातील अनेक दर्जेदार बुद्धिबळ खेळाडू घडवण्यासाठी वेळोवेळी स्पर्धा आयोजित करण्यात येत असून बुद्धिबळ हा खेळ जिल्ह्यातील ग्रामीण भागात तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात खेळ वाढवण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रयत्न केला जात आहे. जे खेळाडू इतर स्पर्धेत टाळ्या वाजवतात त्यांना या स्पर्धेत रोख बक्षीस देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेत अनेक खेळाडूंना आंतरराष्ट्रीय मानांकन मिळाले.
स्पर्धेचा अंतिम निकाल
ओपन गट ः १. प्रशांत सोमवंशी, २. देवेंद्र परमार, ३. शिबांतक शहा, ४. वैभव संकनाबाशेत्तर, ५. सार्थक शिंदे, ६. सोहम नगरेचा, ७. सोहम रूमदे, ८. राजवर्धन तनवर, ९. धनंजय खाडे, १०. श्रीधर तावडे, ११. नीरज देसाई, १२. दीपक कुतियपण, १३. दीपणकर कांबळे, १४. विठ्ठल खिल्लारे, १५. आदित्य तिवारी.
बेस्ट रेटिग १५०० ः १. गणेश कुमार, २. अजय राजवत, ३. सोहम लांगोरे, ४. प्रथम शस्त्रबुद्धे, ५. योगराज महाले, ६. आंबेरे ओजस, ७. रामा कीलुमु, ८. महादेव पंचम, ९. चारीत सुभाजित, १०. अथर्व घोडके.
बेस्ट अनरेटेड ः १. प्रसाद फडके, २. प्रणव हलभवी, ३. नरकर शहा, ४. विजय जाधव, ५. धोंडी भावेश, ६. सुजल लांबोरे, ७. संकेत खोट, ८. राजकुमार बंडगर, ९. ओमकार पवार, १०. रिदम शहा.
उत्कृष्ट महिला खेळाडू ः १. दुर्वा बोंबले, २. तन्मई घेते, ३. अश्वी अग्रवाल, ४. कृतिका पुस्तके, ५. पलक सोनी, ६. भक्ती गवळी, ७. स्वरा गांधी, ८. रेणुका गोविंदवर, ९. प्रणिता भावा, १०. हर्षी गुप्ता.
बेस्ट ६० वयस्कर खेळाडू ः १. दीपक ढेपले, २. ओपी तिवारी, ३. साहू कुमार, ४. करणकर पद्माकर, ५. संजय भंगे.
बेस्ट ५० वयस्कर खेळाडू ः १. अभिजीत फडके, २. एस कल्कावकर, ३. संजय तोडकर, ४. सुनील जोशी, ५. धनंजय काकडे.
बेस्ट अहिल्यानगर खेळाडू ः १. यश धाडगे, २. अनय महामुनी, ३. वेदांती इंगळे, ४. हिमांशू मकीजा, ५. वर्धन अच्छा.
बेस्ट अहिल्यानगर तालुका खेळाडू ः १. आदेश देखने, २. तन्मय नीली, ३. राजवीर शिंदे, ४. तेजस वायल, ५. नक्ष गांधी.
उत्कृष्ट १५ वर्षाखालील खेळाडू ः १. सायली झेंडे, २. व्यंकटेश करवा, ३. कृष्णा कुलकर्णी, ४. श्रीहर्ष नईर, ५. अर्णव तोतला.
उत्कृष्ट १३ वर्षाखालील खेळाडू ः १. ऋग्वेद पोद्दार, २. ब्रिजेश, ३. यश टंडन, ४. आराध्या वाघ, ५. सिद्धांत नारायण.
उत्कृष्ट ११ वर्षाखालील खेळाडू ः १. रुद्रा अग्रवाल, २. प्रेयस वाघमारे, ३. जय मेहता, ४. श्रीयश कुदळे, ५. सर्वध्या बालगुडे.
उत्कृष्ट ९ वर्षाखालील खेळाडू ः १. रियांश बोराटे, २. देवांश पाटील, ३. आदिनाथ म्हणते, ४. रिधान अग्रवाल, ५. अध्रित डूबे.
उत्कृष्ट ७ वर्षाखालील खेळाडू ः १. कविष भातड, २. प्रीतिका नंदी, ३. ईशान अग्निहोत्री, ४. आराध्या देसाई, ५. कबीर दळवी.