
साक्री (जि. धुळे) ः साक्री तालुका एज्युकेशन सोसायटी, साक्री संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय साक्री येथे इयत्ता अकरावीच्या वर्गात नव्याने प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी प्राचार्य, उपप्राचार्य व सर्व शिक्षक बंधू-भगिनींच्या उपस्थितीत बँड पथकाच्या गजरात गुलाब पुष्प देऊन नवोदित विद्यार्थ्यांचे इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांकडून स्वागत करण्यात आले. योगेश निकम व वैशाली खैरनार यांच्या समूहाने स्वागत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. शिवाजी देवरे यांनी कनिष्ठ महाविद्यालयात राबवले जाणारे विविध शालेय व सहशालेय उपक्रम, शिस्त याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. पालक म्हणून रवी खैरनार यांनी मनोगत व्यक्त केले.
विद्यालयाचे प्राचार्य दादासाहेब प्रमोद बेडसे यांनी विद्यालयात विविध जयंती व पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी केल्या जातात याच्याबद्दल तसेच विद्यालयाची शिस्त आणि विद्यालयाच्या उज्वल परंपरेबद्दल माहिती दिली. उपप्राचार्य पी एफ शिवदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
दिनेश बेडसे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अकरावीत नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना संस्थेची १९४० सालापासून न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, साक्रीसह सर्व विविध शाखांची व संस्थेच्या सर्व पदाधिकारी अध्यक्ष सचिव विश्वस्त व्यवस्थापक मंडळ सदस्य या सर्वांबद्दल थोडक्यात माहिती सांगितली. तसेच सर्व प्राध्यापक यांची ओळख करून दिली.