
अहिल्यानगर ः संजीवनी युनिव्हर्सिटीच्या इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाच्या प्रयत्नाने संजीवनी युनिव्हर्सिटीतील एमबीए, बीबीए, बीटेक आणि एमएससीच्या एकूण आठ विद्यार्थ्यांची रशियाच्या नामांकित उरल फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये पंधरा दिवसांच्या इंटर्नशिपसाठी निवड करण्यात आली आहे आणि हे विद्यार्थी रशियात दाखल झाले आहेत.

या विद्यार्थ्यांसमवेत फॅकल्टी एक्सचेंज उपक्रमांतर्गत इंटरनॅशनल विभागाचे डीन डॉ महेंद्र गवळी हे देखील रशियाला गेले आहेत. उरल फेडरल युनिव्हर्सिटी व संजीवनी विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार झालेला असून या कराराचे हे फलित आहे अशी माहिती संजीवनी विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.
रशियात दाखल झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये खुश पटेल, राघवेंद्र नायडू, आर्या कुंटे, अनिकेत धामणे, ध्रुव सोनी, ईश्वरी पवार, ऋषिका उंडे, वैष्णवी निकुंभ यांचा समावेश आहे. संजीवनीचे अध्यक्ष नितीन कोल्हे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट अमित कोल्हे यांनी इंटर्नशिपसाठी सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. या प्रसंगी व्हाईस चांसलर डॉ ए जी ठाकूर, संचालक डॉ एम व्ही नागरहल्ली, डीन डॉ कविथा राणी, डॉ समाधान दहिकर, डॉ माधुरी जावळे, डॉ विनोद मालकर, डॉ देवयानी भामरे, डॉ महेंद्र गवळी आदी उपस्थित होते.