
साक्री (जि. धुळे) ः न्यू इंग्लिश स्कूल साक्री येथे लोकशाही पद्धतीने शालेय मंत्रीमंडळासाठी मतदान घेण्यात आले. त्याचा निकाल व शपथग्रहणप्रथमत:च या निवडणुकीत ईव्हीएम अॅपचा वापर करुन मतदान घेण्यात आले.
सर्व प्रथम इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्विकारुन ईव्हीएम अॅपवर सर्व विद्यार्थ्यांचे नाव व फोटो अपलोड करण्यात आले. उमेदवार विद्यार्थ्यांना प्रचारासाठी पुरेसा वेळ देण्यात आला. मतदान अधिकारी क्रमांक १ म्हणून भूषण बोरसे यांनी सांभाळत मतदारांची ओळख पटविण्याचे काम पाहिले , मतदान अधिकारी २ म्हणून कुणाला नांद्रे यांनी सांभाळली. मतदान अधिकारी ३ म्हणून सचिन पिंपळे यांनी काम पाहिले. मतदान केंद्राध्यक्ष म्हणून पंकज पाटील यांनी कामकाज पाहिले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रसाद भाडणेकर व रणजित ठाकरे यांनी कामकाज सांभाळले.
मतदान सुरु करण्यापुर्वी सर्व मतदारांना विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद बेडसे यांनी मार्गदर्शन केले. पर्यवेक्षक अविनाश सोनार व बन्सिलाल बागुल यांच्या निरीक्षणात मतदान पार पडले. या कामी अविनाश भदाणे, सुरेश मोहने, रवींद्र भामरे, मिलिंद सोनवणे, महेंद्र साबळे, पराग नेरकर, सचिन बहिरम, सतिष नेरे, मयूर ठाकरे, लक्ष्मीकांत देवरे, सोमनाथ बागुल, मीना सुर्यवंशी, सुनंदा शिंगाणे यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांनी लोकशाही मार्गाने निवडणूक कशी पारपाडली जाते याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
मतदान पार पडल्यानंतर लगेच एकूण मतदानाची आकडेवारी घेण्यात आली. प्राचार्य प्रमोद बेडसे यांनी निकाल बटनावर क्लिक करुन निकाल घेण्यात आला. या निवडणुकीत मुख्यमंत्रीपदी विलक्षा प्रवीण काकुस्ते, उपमुख्यमंत्रीपदी दिग्विजय दीपक मगरे, अभ्यास मंत्री पदी श्रावणी मनोहर देसले, क्रीडा मंत्रीपदी जयेश मोहन गावित, सांस्कृतिक मंत्रीपदी दिव्या हेमराज काकुस्ते, प्रार्थना मंत्रीपदी तेजस्विनी विठ्ठल चव्हाण, सहल मंत्रीपदी वर्षा किशोर शिरसाठ, अर्थमंत्री पदी गंगेश सुरेश ठाकरे, वाद विवाद मंत्रीपदी अदनान जावेद खाटीक, पर्यावरण मंत्रीपदी खुशी अशोक मार्गे, आरोग्य मंत्रीपदी महेक नाजीम पिंजारी, हस्तलिखितमंत्री पदी गौरव भूषण खैरनार या विद्यार्थ्यांना विजयी घोषत करण्यात आले.
सर्व विजयी उमेदवारांना पद व गोपनियतेची शपथ विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद बेडसे यांनी दिली व सर्व विजयी उमेदवारांना विजयी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. विजयी विद्यार्थ्यांचे प्राचार्य प्रमोद बेडसे, उपमुख्याध्यापक विलास गोसावी, पर्यवेक्षक अविनाश सोनार, बन्सीलाल बागुल, सतिष सोनवणे, कार्यालयीन अधिक्षक प्रशांत पवार व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.