< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); विराज देशपांडे यांच्या संघर्षाची विलक्षण कथा असलेले ‘बाबा’ पुस्तक प्रकाशित  – Sport Splus

विराज देशपांडे यांच्या संघर्षाची विलक्षण कथा असलेले ‘बाबा’ पुस्तक प्रकाशित 

  • By admin
  • July 25, 2025
  • 0
  • 35 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर/ऑकलंड ः छत्रपती संभाजीनगरचा सुपुत्र विराज देशपांडे यांनी आपल्या वडिलांना वाहिलेलं आणि स्वतःच्या आयुष्यातल्या संघर्ष, नातेसंबंध, आणि स्थलांतराच्या अनुभवांवर आधारित असलेलं पुस्तक ‘BABA: How We Carry Our Fathers. And How We Become Them.’ प्रकाशित केले आहे. 

न्यूझीलंडमधील Lasavia Publishing तर्फे हे पुस्तक प्रकाशित झाले असून ते वाचक आणि समीक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळवत आहे. विराज देशपांडे हे दिवंगत राजेंद्र देशपांडे (क्रिकेटपटू, बँक अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते) यांचे चिरंजीव असून सध्या ते ऑकलंडमध्ये लेखक, क्रिकेट पंच, डिजिटल रणनीतीकार आणि आरोग्य व्यवस्थापक अशा अनेक भूमिकांमध्ये कार्यरत आहेत. विराज देशपांडे यांनी न्यूझीलंडच्या एयूटी विद्यापीठातून क्रिएटिव्ह रायटिंगमध्ये मास्टर्स केलं असून, हेच शिक्षण घेण्यासाठी त्यांनी २०१७ साली भारतातून न्यूझीलंड गाठलं.

या पुस्तकाच्या प्रस्तावनेत न्यूझीलंडचे नामवंत लेखक माईक जॉन्सन लिहितात की, विराजची शैली नैसर्गिक, मैत्रीपूर्ण आणि स्वागतार्ह आहे. त्याचे लेखन प्रेरणादायी आहे आणि ते प्रामाणिकपणा आणि विनोदाने भरलेले आहे. या पुस्तकात अनेक गोष्टी आहेत: एक आकर्षक कथा, क्रिकेटला श्रद्धांजली, त्याच्या कुटुंबाला श्रद्धांजली, स्थलांतराची कहाणी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे – ते वाचायला चांगले आहे.”

क्रिकेटमधील गुपित उलगडणारा लेखक या पुस्तकात विराज एका माजी भारतीय क्रिकेटपटूच्या सोशल मीडिया खात्याचं गुप्तपणे सहा वर्षांपासून कसं व्यवस्थापन करतोय याचा सविस्तर वृत्तांत दिला आहे. ट्विटरवरील खुमासदार आणि सडेतोड शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या त्या क्रिकेटपटूच्या खात्यामागचा खरा चेहरा विराज असल्याचं त्यांनी पहिल्यांदाच उघड केलं आहे. मुंबईतील एका अप्रतिम भेटीतून ही संधी त्यांना कशी मिळाली, याची रोमांचक कहाणीही पुस्तकात आहे.

व्यवसाय आणि लेखनाचा प्रवास
न्यूझीलंडला येण्यापूर्वी विराजने criczest.com नावाचं यशस्वी क्रिकेट संकेतस्थळ सुरू केलं होतं. Having a Start-Up Before Start-Ups Were Cool या प्रकरणात त्यांनी आपल्या व्यावसायिक प्रवासाचं वर्णन केलं आहे.

आरोग्य व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका
सध्या ते NZ Health Groupच्या हॉक्‍स बे रिजन मधल्या क्लायंट्स आणि क्लिनिकल टीमची जबाबदारी सांभाळतात, पॅलिटिव्ह रुग्णांसाठी शेवटचे काही दिवस हॉस्पिटल ऐवजी घरच्या वातावरणात परिवारासोबत घालवता यावेत यासाठी आवश्यक हेल्थकेअर सेवा ते पुरवतात. रात्री २ वाजता वडिलांसोबत टेस्ट मॅचेस पाहण्यासाठी उठण्यापासून ते “क्रिकेट ट्विटर”चा गुप्त सम्राट होण्यापर्यंतचा हा प्रवास, एका क्रिकेटवेड्या छोट्या शहरातल्या भारतीय मुलाने आयुष्यातील सगळ्या अपेक्षांना छेद देत, पारंपरिक नोकरी टाळत, स्टार्ट-अप्स ‘कूल’ होण्याच्या आधीच एक यशस्वी व्यवसाय उभा करत, प्रेम मिळवून, ते गमावून, अखेर आपल्या हृदयाचं ऐकत न्यूझीलंड गाठलेली एक उत्स्फूर्त आणि भावनिक कहाणी यांचं विलक्षण मिश्रण म्हणजे ‘बाबा’.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *