
सोलापूर ः सोलापूर जिल्हा लॉन टेनिस संघटनेने अखिल भारतीय लॉन टेनिस संघटना व महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या मान्यतेखाली आयोजित केलेल्या वरिष्ठांच्या चौथ्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेस येथे सुरुवात झाली. या स्पर्धेत देशभरातून १७५ खेळाडू सहभागी झाले आहेत.
कुमठा नाका येथील जिल्हा क्रीडा संकुलात याचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी स्पर्धेचे पर्यवेक्षक वैशाली शेकटकर, स्पर्धा संचालक डोसा रामाराव, एमएसएलटीएचे मानद सहसचिव राजीव देसाई, आंतरराष्ट्रीय टेनिसपटू संध्याराणी बंडगर, दिलीप बच्चुवर, पंकज शहा, कर्नल देवानंद मठपती, डॉ राजू कारंडे, रूपेश बिद्री, कुमार रव्हा व खेळाडू उपस्थित होते.