
यवतमाळ ः यवतमाळ जिल्हा क्रीडा परिषद आणि यवतमाळ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन जायंट्स इंग्लिश मीडियम स्कूल वडगाव येथे करण्यात आले होते. १४, १७ व १९ वर्षांखालील गटात झालेल्या या स्पर्धेला खेळाडूंचा मोठा प्रतिसाद लाभला.
तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा १४, १७ १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या गटात घेण्यात आली. या स्पर्धेला उद्घाटक म्हणून यवतमाळ जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे अध्यक्ष अॅड जीवन पाटील व शाळेचे उपाध्यक्ष अनिरुद्ध पांडे, मुख्याध्यापक योगेशसिंह चौहान, यवतमाळ तालुका क्रीडा संयोजक किरण फुलझेले हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपीली वैघ यांनी केले.तसेच स्पर्धेदरम्यान यवतमाळ माध्यमिक शिक्षणाधिकारी रविंद्र कोटोलकर व यवतमाळ व प्राथमिक शिक्षणाधिकारी नगर परिषद योगेश डाफ यांनी स्पर्धेला भेट दिली व खेळाडूला मार्गदर्शन केले आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी खेळाडू सोबत बुद्धिबळ खेळायचा आनंद घेतला.

तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांनी स्पर्धेला भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले प्रत्येक गटातून पाच खेळाडूंची निवड करून जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे नावे द्यावीत व संपूर्ण जिल्ह्यामधून १०० ते २०० खेळाडू एकत्रित करून त्याचे सामने घेण्यात येतील व विद्यार्थ्यांना उत्कृष्ट बक्षिसे व शाळेला पारितोषिक देण्यात येईल असे जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांनी सांगितले.
यावेळी जायंट्स इंग्लिश मीडियम स्कूलचे सचिव रमेश छेडा, उपाध्यक्ष अनिरुद्ध पांडे, मुख्याध्यापक योगेशसिंह चौहान, यवतमाळ जिल्हा क्रीडा चैताली राऊत यवतमाळ तालुका संयोजक किरण फुलझेले उपस्थित होते. मुख्य पंच म्हणून मोहन केळापुरे, अविनाश पुंड, राष्ट्रीय पंच पुसद प्रा अविनाश मसराम, सुर्यवंशी आंबुलकर, राहुल ढोणे, राजेश कळसकर, प्रफुल गावंडे, नरेंद्र भुसे, राधिका जैस्वाल, बंटी शाहाळे अभिजित पवार, निखिल बुटले उपस्थित होते. यवतमाळ तालुका क्रीडा संयोजक किरण फुलझेले यांनी प्रास्ताविक केले तर शाळेचे मुख्याध्यापक योगेशसिंह चौहान यांनी आभार मानले.
शाळेचे अध्यक्ष सुभाष जैन, उपाध्यक्ष अनिरुद्ध पांडे, गुरुबक्ष अहुजा, कोषाध्यक्ष सुहास चिद्दरवार, संचालक प्रकाश चोपडा, डॉ पद्मावार, मुकुंद औदार्य, शंकर भुत यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले.
स्पर्धेचा अंतिम निकाल
अंडर १४ मुली ः झेन बडवाईक, ध्वनी बाजोरिया, चारुशी अग्रवाल, त्रिवेणी कटुकले आणि तीर्थ वाघमारे.
अंडर १४ मुले ः समर्थ मसराम, मयंक हिडोंचा, तन्मय बनसोड, रियान बाजोरिया आणि हिशन जाधव.
अंडर १७ मुले ः नमन मोर, प्रीतम गढिया, दर्शिल लाहोटी, विग्नेश गुप्ता.
अंडर १७ मुली ः कनिष्का चक्कवार, माही बाजोरिया, वेरेनिका चांदेकर, विधी चिमेडिया, काशवी पिंपरिया.
अंडर १९ मुले ः अर्णव घुमनर, सोमया चौधरी, प्रथमेश नारकर, लोकेश मोरे, सोहन नाईक.
अंडर १९ मुली ः सृष्टी कटूकते, हर्षदा कुचेरिया, मिशा रहेजा, श्रावी घुईखेडकर, अनुष्का किनकर.