
धुळे ः नेटबॉल फेडरेशन इंडियाच्या वतीने हरियाणा येथे २८ ते ३१ ऑगस्ट दरम्यान होणारी दुसरी सीनिअर मिश्र व चौथी फास्ट फाईव्ह आणि १ ते ४ ऑगस्ट दरम्यान चंदीगड येथे होणारी पश्चिम विभागीय राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ निवडीकरीता अमरावती निवड चाचणी घेण्यात आली. या चाचणीला मोठा प्रतिसाद लाभला.
अमरावती येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या मैदानावर महाराष्ट्र अॅम्युचर नेटबॉल असोसिएशनची अॅडहॉक कमिटीच्या वतीने निवड चाचणी घेण्यात आली. त्यात राज्यभरातील विविध जिल्ह्यातून पुरुष व महिला खेळाडू सहभागी झाले होते. निवड चाचणी स्पर्धेचे उद्घाटन अमरावतीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा आर एस राव, अॅडहॉक कमिटीचे अध्यक्ष डॉ एस एन मूर्ती, संयोजक ऋतुराज यादव, सदस्य पवनकुमार पटले, नेटबॉल फेडरेशन इंडियाचे निरीक्षक एस. मोहन राव (छत्तीसगड), अमरावती, अकोला व धुळे नेटबॉल असोसिएशनचे सचिव सुनील कडू, जयदीप सोनखासकर, योगेश वाघ, प्रशिक्षक नितीन जाधव आदी उपस्थित होते.