
हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथे आंतरशालेय तालुका क्रीडा स्पर्धा आयोजन करण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय हिंगोली आणि गटशिक्षणाधिकारी कार्यालय सेनगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सेनगाव येथील देवडा माध्यमिक विद्यालय येथे २०२५-२६ या वर्षातील आंतरशालेय सेनगाव तालुका क्रीडा स्पर्धा आयोजन बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी गट शिक्षण अधिकारी गव्हाने हे होते. प्रमुख पाहुणे शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष रमेश गंगावणे, तालुका क्रीडा संयोजक सोपान नाईक, हेमंत शिंदे, प्राचार्य रमेश कापसे, क्रीडा अधिकारी वासिम शेख, सायकल संघटना सचिव इंगोले हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनटक्के यांनी केले. संतोष शिंदे यांनी आभार मानले. या बैठकीस सेनगाव तालुक्यातील क्रीडा शिक्षक, मुख्याध्यापक उपस्थित होते. बैठकीच्या यशस्वीतेसाठी रहीम कुरेशी, पवन राठोड, फाले, गेडाम, गाडेकर, भिवंडे, तोडकर, राठोड, इंगोले यांनी परिश्रम घेतले.