
जळगाव ः विवेकानंद व्यायाम शाळा, स्वातंत्र्य चौक, जळगाव संचलित माजी खासदार वाय. जी. महाजन सर जिम्नॅशियम हॉल येथील संरक्षण भिंतीचे भूमिपूजन करण्यात आले.
जळगावचे आमदार सुरेश दामू भोळे, जिल्हा क्रीडा महासंघाचे अध्यक्ष व चोपडा तालुक्याचे आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे, उपजिल्हाधिकारी नितीन महाजन, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, माजी नगरसेविका उज्वला बेंडाळे, माजी नगरसेवक धीरज मुरलीधर सोनवणे, माजी नगरसेवक विशाल त्रिपाठी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
व्यायाम शाळेचे अध्यक्ष पी ई तात्या पाटील, तसेच लेखराज उपाध्याय, माजी नगरसेवक अरविंद राणे, चंद्रशेखर त्रिपाठी, किरण बेंडाळे, ॲड रवींद्र कुलकर्णी , प्रशांत कुलकर्णी, सचिन गायकवाड, प्रभाकर गायकवाड, जितू निंबाळकर, धर्मेंद्र शालिक धनगर, शुभम पाटील, विशाल रंधे, शुभम पारधे, भाजपा क्रीडा आघाडी अध्यक्ष अरुण श्रीखंडे, महेश पाटील, शिरीष राणे, रमेश सिंगी. मनीष सपके यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत केले .
जळगावचे आमदार सुरेश दामू भोळे यांनी जळगाव शहरातील आवश्यक असलेल्या क्रीडा सुविद्या उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे सांगितले. आमदार प्रा. चंद्रकात सोनवणे यांची क्रीडा क्षेत्राला सहकार्य करण्याची भूमिका कायम असते. क्रीडा क्षेत्राचा विकास व्हावा या दृष्टीने शासन दरबारी मी सातत्याने पाठपुरावा करत असतो. युवकांनी व्यायाम करून शरीर सुदृढ ठेवणे आवश्यक आहे. क्रीडा क्षेत्रातील आपल्या कोणत्याही अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन डॉ प्रदीप तळवेलकर यांनी केले.