मुंबई : रोप स्किपिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, सॅचिटॅरियस स्पोर्ट्स आणि प्लेफुल अरेना यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (२७ जुलै) फिटनेससाठी रोप स्किपिंग उपक्रम राबवण्यात येणार आहे. ‘स्किपिंग ऑन रविवार’ या विशेष कार्यक्रमासाठी फिटनेसप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन विनायक नायर यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशव्यापी फिटनेस मोहिमेअंतर्गत आणि इंडियन रोप स्किपिंग फेडरेशनच्या पाठिंब्याने ‘स्किपिंग ऑन रविवार’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रविवारी (२७ जुलै) सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत घाटकोपर मेट्रो स्टेशन, कॉन्कोर्स २, घाटकोपर पश्चिम, मुंबई येथे हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम शालेय विद्यार्थी, क्रीडा उत्साही आणि सामान्य लोकांमध्ये रोप स्किपिंगला प्रोत्साहन देण्यासाठी आहे, ज्यामुळे कौशल्ये प्रदर्शित करण्यासाठी आणि सक्रिय होण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ मिळेल. फिट इंडिया चळवळीचा भाग व्हा आणि एकत्रितपणे भारताला तंदुरुस्त बनवण्याची प्रतिज्ञा करूया. अधिक माहितीसाठी विनायक नायर (९८६७७७४३७२), मिलिंद पांचाळ (९९६९५०७५२६), वैभव सागवेकर (९२२०७७९९०८), मयूर चंद्रकांत पांचाळ (८३६९९३२३८२) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.