
मँचेस्टर : भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टरमध्ये कसोटी मालिकेतील चौथा सामना खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने शानदार शतक झळकावले आहे. तो १९८ चेंडूत १४१ धावांची खेळी खेळून बाद झाला. या सामन्यात त्याने असा पराक्रम केला आहे जो इंग्लंडचा कोणताही कर्णधार कसोटी स्वरूपात यापूर्वी करू शकला नाही. या सामन्यात स्टोक्सने गोलंदाजी तसेच फलंदाजीतही शानदार कामगिरी केली.
बेन स्टोक्सचा कर्णधार म्हणून पहिल्यांदाच असा पराक्रम
बेन स्टोक्स एकाच सामन्यात शतक झळकावणारा आणि एका डावात पाच विकेट घेणारा इंग्लंडचा पहिला कर्णधार बनला आहे. एकूणच, तो एकाच सामन्यात शतक झळकावणारा आणि पाच विकेट घेणारा इंग्लंडचा तिसरा खेळाडू आहे. त्याच्या आधी इयान बोथमने इंग्लंडसाठी पाच वेळा ही कामगिरी केली होती. टोनी ग्रेग आणि गॅस अॅटकिन्सन यांनी प्रत्येकी एकदा ही कामगिरी केली आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये एका सामन्यात शतक आणि पाच विकेट घेणाऱ्या कर्णधारांबद्दल बोलायचे झाले तर, हा पराक्रम आतापर्यंत पाच कर्णधारांनी केला आहे. हा पराक्रम पहिल्यांदा वेस्ट इंडिजच्या डेनिस अॅटकिन्सनने १९५५ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध केला होता. यादीत दुसरे नाव वेस्ट इंडिजच्या गॅरी सोबर्सचे आहे, त्यांनी १९६६ मध्ये इंग्लंडविरुद्ध हे केले होते. पाकिस्तानचा मुश्ताक मोहम्मदने १९८३ मध्ये भारताविरुद्ध हे केले होते. इम्रान खान चौथ्या क्रमांकावर आहे, त्यांनी १९८३ मध्ये भारताविरुद्ध हे केले होते. बेन स्टोक्स आता असे करणारा पाचवा कर्णधार बनला आहे.
कसोटी सामन्यात शतक आणि पाच विकेट घेणारे कर्णधार
डेनिस अॅटकिन्सन (वेस्ट इंडीज) विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ब्रिजटाऊन, १९५५
गॅरी सोबर्स (वेस्ट इंडीज) विरुद्ध इंग्लंड, लीड्स, १९६६
मुश्ताक मोहम्मद (पाकिस्तान) विरुद्ध वेस्ट इंडीज, पोर्ट ऑफ स्पेन, १९७७
इम्रान खान (पाकिस्तान) विरुद्ध भारत, फैसलाबाद, १९८३
बेन स्टोक्स (इंग्लंड) विरुद्ध भारत, मँचेस्टर, २०२५