
छत्रपती संभाजीनगर : ऑल इंडिया चेस फेडरेशन द्वारा आयोजित अहिल्यानगर येथे झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय बुद्धिबळ आरबिटर परीक्षेत शुभांगी कुलकर्णी यांनी पहिल्याच प्रयत्नात चांगले यश प्राप्त केले आहे
या परीक्षेसाठी देशभरातून ५५ जणांनी सहभाग नोंदवला होता. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ नियमावली, स्पर्धा आयोजन, पेरिंग, आरबीटरचा रोल आणि निर्णय या सारखे कठीण विषय यामध्ये होते. छत्रपती संभाजीनगर शहरातून शुभांगी कुलकर्णी या एकमेव महिला होत्या. या परीक्षेत प्रवीण जोशी आणि वैभव पटवर्धन हे उत्तीर्ण झाले.
राज्यस्तर पर्यंतच्या सर्व स्तरावरील सर्व प्रकारच्या बुद्धिबळ स्पर्धांसाठी शुभांगी कुलकर्णी आता पंच म्हणून कार्यरत होतील. ग्रामीण भागातून येऊन बुद्धिबळ सारख्या कठीण खेळातील आरबीटर होणे अतिशय कौतुकास्पद आहे. गुणवंत विक्रमवीर बुद्धिबळ खेळाडू वल्लभ कुलकर्णी याच्या त्या आई आहेत. पालक म्हणून वल्लभच्या यशासाठी सर्व प्रकारचे प्रयत्नशील आई म्हणून तसेच बुद्धिबळ खेळविषयी असलेला समर्पण भाव आणि त्यांचा अभूतपूर्व यशाबद्दल छत्रपती संभाजीनगर बुद्धिबळ संघटनेचे सचिव हेमेन्द्र पटेल, तसेच मिथुन वाघमारे, अमरीश जोशी, विलास राजपूत, अमरदिप तिवारी यांनी विशेष अभिनंदन केले आहे.