
फोर्ट लॉडरडेल (अमेरिका) : स्टार सामन्यात सहभागी न झाल्याबद्दल मेजर लीग सॉकर (एमएलएस) ने लिओनेल मेस्सी आणि जॉर्डी अल्बा यांना एका सामन्यासाठी निलंबित केले आहे, ज्याचा त्यांच्या क्लब इंटर मियामीने निषेध केला आहे.
इंटर मियामीचे मालक जॉर्ज मास यांनी शुक्रवारी एका सामन्याच्या निलंबनाबद्दल सांगितले की, ‘प्रदर्शनी सामन्यात सहभागी न झाल्याने थेट निलंबन का होते हे त्यांच्या समजण्यापलीकडे आहे.’
एमएलएस आणि मेक्सिकोच्या लीगा एमएक्स यांच्यातील सामन्यासाठी संघात निवड होऊनही मेस्सी आणि अल्बा सहभागी झाले नाहीत. व्यस्त वेळापत्रकात मेस्सी विश्रांतीसाठी खेळला नाही आणि अल्बा त्याच्या मागील दुखापतीशी झुंजत आहे.
मास म्हणाले की क्लबने मेस्सी आणि अल्बा यांना ऑल-स्टार सामन्यातून बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एमएलएस नियमांनुसार, लीगच्या परवानगीशिवाय ऑल स्टार सामन्यात न खेळणारा कोणताही खेळाडू एका सामन्यासाठी निलंबित केला जातो.