
नागपूर ः बँकर्स स्पोर्ट्स कौन्सिल नागपूर यांनी बँक ऑफ महाराष्ट्र क्रेडिट कोऑपरेटिव्ह हॉलमध्ये आयोजित केलेल्या ५८ व्या इंटर बँक कॅरम स्पर्धेत आरबीआय डी आणि गतविजेत्या पंजाब नॅशनल बँक यांच्यात विजेतेपदाचा सामना होणार आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रचे माजी डीजीएम उमेश पराते यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. बँकर्स स्पोर्ट्स कौन्सिलचे उपाध्यक्ष प्रफुल्ल नांदेडकर यांनी त्यांचे स्वागत केले केले. उद्घाटनासाठी विशेष पाहुणे असलेले बँक ऑफ महाराष्ट्रचे एजीएम हेमंत सहारे यांचे स्वागत बँक ऑफ महाराष्ट्राचे ललित कोलते यांनी केले.
मुख्य पंच सिद्धार्थ नारनवरे यांचे स्वागत बीएससीचे कार्यकारी सदस्य प्रवीण गुरुंग यांनी केले तर सहाय्यक मुख्य पंच मनोहर वानखेडे यांचे स्वागत पीएनबीचे अश्विन अंजनकर यांनी केले. संचालन सेक्रेटरी मंगेश पुराणिक यांनी केले आणि आभार मानले. त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रचे अनुभवी नेते डी एम दुर्गे यांचे स्वागत केले.