< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); राज्य शालेय क्रीडा स्पर्धेची ठिकाणे जाहीर – Sport Splus

राज्य शालेय क्रीडा स्पर्धेची ठिकाणे जाहीर

  • By admin
  • July 29, 2025
  • 0
  • 472 Views
Spread the love

नागपूरला शुटींग, जिम्नॅस्टिक्स व सॉफ्टबॉल; संभाजीनगरला तायक्वांदो, योगासन, वुशू

सोलापूर ः क्रीडा व युवक सेवा खात्याचे सहसंचालक सुधीर मोरे यांनी यंदाच्या शैक्षणिक वर्षात होणाऱ्या राज्य शालेय क्रीडा स्पर्धेची ९२ खेळापैकी ५२ खेळांची ठिकाणे जाहीर केली आहेत. त्यात नागपूर येथे शुटींग, जिम्नॅस्टिक्स व सॉफ्टबॉल तर धाराशिवला आट्यापाट्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

राज्यातील सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या बैठकीत ही ठिकाणे निश्चित करण्यात आली. सिकई मार्शल आर्ट हा खेळ वगळता उर्वरित ९२ खेळ प्रकाराचे आयोजन करावे, असे ठरले. यातील प्रथम ४८ खेळानांच निधी मिळणार आहे. मिनी गोल्फ आष्टे-डू-आखाडा, जंप रोप व रस्सीखेच या खेळांना निधी मिळणार नाही. या खेळाच्या एकविध संघटनेच्या तांत्रिक व आर्थिक सहकार्याने या स्पर्धा आयोजित करण्याचे यावेळी ठरले.

सोलापुरात एकाही स्पर्धेचे आयोजन नाही
सोलापूर जिल्हा क्रीडा कार्यालयाचा कारभार सध्या जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, क्रीडा अधिकारी नदीम शेख आणि मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी दत्ता वरकड या तिघांवर चालू आहे. तीन तालुका क्रीडाधिकारी, दोन क्रीडाधिकारी, दोन क्रीडा मार्गदर्शक, एक वरिष्ठ व एक कनिष्ठ लिपीक अशी ९ पदे रिक्त आहे. कर्मचारी अभावी राज्य स्पर्धेचे आयोजन शक्य नाही. त्यामुळे सोलापुरने एकाही स्पर्धेच्या आयोजनाची मागणी केली नसल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी सांगितले.

स्पर्धेचे क्रीडा प्रकार, स्थळ व वयोगट याप्रमाणे

धनुर्विद्या ः यवतमाळ (१४ व १७ वर्षे), वाशिम (१९ वर्षे). ॲथलेटिक्स ः रत्नागिरी (१४ वर्षे), पुणे (१७ व १९ वर्षे). बॅडमिंटन ः अहिल्यानगर (१४ वर्षे), छत्रपती संभाजीनगर (१७ व १९ वर्षे). बॉल बॅडमिंटन ः नांदेड (१४ वर्षे), सातारा (१७ व १९ वर्षे). बेसबॉल ः अकोला (१४ वर्षे), अहिल्यानगर (१७ वर्षे), पालघर (१९ वर्षे). बास्केटबॉल ः धुळे (१४ वर्षे), यवतमाळ (१७ व १९ वर्षे). बॉक्सिंग ः रायगड (सर्व गट). कॅरम ः कोल्हापूर (सर्व गट), बुद्धिबळ ः सातारा (सर्व गट). क्रिकेट ः नाशिक (१४ व १९ वर्षे), अहिल्यानगर (१७ वर्षे). लॉन टेनिस ः लातूर (सर्व गट). डॉजबॉल ः नांदेड (१४ वर्षे), रत्नागिरी (१७ वर्षे), बुलढाणा (१९ वर्षे), तलवारबाजी ः नांदेड (१४ वर्षे), नाशिक (१७ वर्षे), छत्रपती संभाजीनगर (१९ वर्षे). फुटबॉल ः अमरावती (१४ वर्षे), यवतमाळ (१७ व १९ वर्षे). जिम्नॅस्टिक्स ः नागपूर (सर्व गट), हँडबॉल ः ठाणे (१४ वर्षे), रायगड (१७ व १९ वर्षे). हॉकी ः अकोला (१४ वर्षे), पुणे (१७ व १९ वर्षे), ज्युदो ः पुणे (सर्व गट). कबड्डी ः रत्नागिरी (१४ मुले), कोल्हापूर (१४ मुली), धुळे (१७ मुले), परभणी (१७ मुली), रायगड (१९ मुले), वाशिम (१९ मुली). कराटे ः पुणे (सर्व गट). खो-खो ः नंदूरबार (१४ मुले), परभणी (१४ मुली), अहिल्यानगर (१७ वर्षे), रायगड (१९ वर्षे). किक बॉक्सिंग ः गोंदिया (सर्व गट). सायकलिंग ः अहिल्यानगर (सर्व गट). मल्लखांब ः नांदेड (१४ वर्षे), लातूर (१७ वर्षे), सांगली (१९ वर्षे). नेटबॉल ः अहिल्यानगर (१४ वर्षे), धुळे (१७ वर्षे), गोंदिया (१९ वर्षे). शुटींग ः नागपूर (सर्व गट). रोलबॉल ः नांदेड (१४ वर्षे), अहिल्यानगर (१७ व १९ वर्षे). रोलर स्केटिंग ः मुंबई उपनगर (सर्व गट). रोलर हॉकी ः मुंबई उपनगर (१९ वर्षे). शुटींगबॉल ः नांदेड (१४ वर्षे), बुलढाणा (१७ वर्षे), अकोला (१९ वर्षे). सॉफ्टबॉल ः मुंबई उपनगर (१४ वर्षे), गडचिरोली (१७ वर्षे), नागपूर (१९ वर्षे). स्क्वॅश ः पुणे (सर्व गट). जलतरण व डायव्हिंग ः लातूर (सर्व गट). वॉटरपोलो ः लातूर (१९ वर्षे). टेबल टेनिस ः परभणी (१४ वर्षे), रायगड (१७ वर्षे), रत्नागिरी (१९ वर्षे). तायक्वांदो ः छत्रपती संभाजीनगर (सर्व गट). व्हॉलिबॉल ः अकोला (१४ वर्षे), गोंदिया (१७ वर्षे), बीड (१९ मुले), सांगली (१९ मुली). वेटलिफ्टिंग ः नाशिक (सर्व गट). कुस्ती ः सिंधुदुर्ग (१४ वर्षे), रायगड (१७ वर्षे), अहिल्यानगर (१९ वर्षे). वुशू व योगासन ः छत्रपती संभाजीनगर (सर्व गट). रग्बी ः ठाणे (१४ वर्षे), अहिल्यानगर (१७ व १९ वर्षे). थ्रोबॉल ः धुळे (सर्व गट). सेपक टकरा ः लातूर (सर्व गट), मॉडर्न पेंटॅथलॉन ः अहिल्यानगर (सर्व गट). सॉफ्ट टेनिस ः पुणे (सर्व गट). टेनिक्वाईट ः वाशिम (सर्व गट). आट्यापाट्या ः धाराशिव (सर्व गट). सुब्रोतो फुटबॉल व नेहरू हॉकी ः पुणे (सर्व गट). मिनी गोल्फ आष्टे-डू-आखाडा ः गडचिरोली व भंडारा (सर्व गट). जंप रोप ः लातूर (सर्व गट). रस्सीखेच ः नांदेड (सर्व गट).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *