
पुणे ः क्रीडा भारतीच्या पश्चिम महाराष्ट्र बैठकीत ज्येष्ठ क्रीडापटू व क्रीडा संघटक विनायक बापट यांनी पुणे महानगर अध्यक्ष म्हणून पदभार सांभाळला.
विनायक बापट हे ज्येष्ठ मोटोक्रॉसपटू असून त्यांनी पूना ऑटोमोटिव्ह रेसिंग असोसिएशनचे (पारा) खजिनदार, पुणे जिल्हा मल्लखांब संघटना या संघटनेचे कार्याध्यक्ष, भारतीय जनता पक्षाच्या पुणे चे कोषाध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य आदी जबाबदाऱ्या यशस्वीरित्या सांभाळल्या आहेत.
क्रीडा भारतीच्या पुणे महानगराच्या उपाध्यक्षपदी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ पंच राजेंद्र शिदोरे, आंतरराष्ट्रीय मास्टर व फिडे प्रशिक्षक जयंत गोखले, अर्जुन पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ कबड्डीपटू व संघटक शकुंतला खटावकर आणि योग प्रशिक्षक डॉ मनाली देव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे महानगरचे मंत्री म्हणून विजय रजपूत व सहमंत्री म्हणून रेखा गोवईकर, जयसिंग जगताप, भाऊराव खुणे, राहुल कुलकर्णी यांची नियुक्ती झाली आहे. खजिनदार पदाची जबाबदारी आनंद कंदलगावकर यांच्याकडे सोपविण्यात आली असून दीपक मेहेंदळे संपर्क प्रमुख तर ज्येष्ठ क्रीडा पत्रकार मिलिंद ढमढेरे हे प्रचार प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत.