
निफाड ः निफाड तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन व क्रीडा सह्याद्री फाउंडेशन नाशिक आयोजित तालुकास्तरीय निवड चाचणी सरस्वती विद्यालयाच्या मैदानावर उत्साहात संपन्न झाली. त्यामध्ये क्रीडा सह्याद्रीच्या खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी नाशिक टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव विलास गायकवाड हे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना टेनिस खेळाबद्दल माहिती व नियम समजून सांगितले. या तालुकास्तरीय स्पर्धेसाठी एकूण ४१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
नाशिक येथे होत असलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी क्रीडा सह्याद्रीच्या खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे क्रीडा सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष विलास गायकवाड, क्रीडा सह्याद्री फाउंडेशनचे सदस्य विनोद गायकवाड, चेतन कुंदे, दत्तू रायते, रमेश वडघुले, प्रतीक्षा कोटकर, अनिता बनकर, विजय घोटेकर, कीर्ती कोटकर, श्याम चौधरी, लखन घटमाळे यांनी सर्वांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.