< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); सीए परीक्षेत देशात प्रथम आलेल्या राजन मनोज काबराची शनिवारी विशेष मुलाखत – Sport Splus

सीए परीक्षेत देशात प्रथम आलेल्या राजन मनोज काबराची शनिवारी विशेष मुलाखत

  • By admin
  • August 1, 2025
  • 0
  • 15 Views
Spread the love

देवगिरी महाविद्यालयात आयोजन

छत्रपती संभाजीनगर ः इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्‍स ऑफ इंडिया यांच्यावतीने मे २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या सीए अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगर शहरातील देवगिरी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी राजन मनोज काबरा याने ६०० पैकी ५१६ गुण मिळवत देशातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.

अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत राजन काबरा याने मिळवलेले हे यश नक्कीच कौतुकास्पद आहे. राजन काबराने मिळवलेल्या अभूतपूर्व यशाबद्दल देवगिरी महाविद्यालयात शनिवारी (२ ऑगस्ट) दुपारी १२ वाजता त्याच्या विशेष मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच यावेळी या उत्तुंग यशाबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते राजन काबराचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. महाविद्यालयाच्या रवींद्रनाथ टागोर सभागृहात हा कार्यक्रम संपन्न होईल.

सीए परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या प्रेरणादायी मुलाखतीचा व या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने सीए मनोज काबरा हेही मार्गदर्शनही करणार आहेत. या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक तेजनकर, उपप्राचार्य डॉ गणेश मोहिते, उपप्राचार्य डॉ रवी पाटील, उपप्राचार्य डॉ अपर्णा तावरे, जेईई नीटचे संचालक प्रा एन जी गायकवाड, उपप्राचार्य प्रा अरुण काटे, उपप्राचार्य प्रा सुरेश लिपाने, उपप्राचार्य प्रा विजय नलावडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *