< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); राज्याचे नवे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे  – Sport Splus

राज्याचे नवे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे 

  • By admin
  • August 1, 2025
  • 0
  • 121 Views
Spread the love

मुंबई ः राज्याचे नवे क्रीडा मंत्री म्हणून माणिकराव कोकाटे यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कोकाटे यांच्याकडून कृषिमंत्रिपद काढून घेण्यात आले आहे. कृषी मंत्री म्हणून क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे सूत्रे सोपवण्यात आली आहे. या खातेबदलाची चर्चा राज्यभर होत आहे. 

माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खाते काढून दत्तात्रय भरणेंकडे सोपविण्यात आल्याची अधिसूचना राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केली आहे.  विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे विधिमंडळ सभागृहात ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर कोकाटे आणि राज्य सरकारवर सर्व स्तरातून टीकेचा भडीमार सुरू झाला होता. तसंच, कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात होती.
राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी माणिकराव कोकाटेंचे विधिमंडळात मोबाईलवर ऑनलाईन रमी खेळतानाचे व्हीडिओ सर्वप्रथम सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले. त्यानंतर कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी राज्य सरकार आणि अजित पवार यांच्यावर दबाव वाढत चालला होता. मात्र, राजीनामा न घेता, खातेबदल करून कोकाटेंना एकप्रकारे दिलासा देण्यात आला आहे.

‘रमी प्रकरणावरून’ वरून लातूरमध्ये झाला होता राडा
माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्य आणि विधिमंडळात रमी खेळण्यामुळे शेतकरी आणि जनतेच्या मनात संतापाची लाट उसळली होती. त्यामुळे विरोधकांकडून आणि शेतकरी संघटनांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. याच मागणीसाठी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेमध्ये पत्ते उधळत आंदोलन केलं आणि “कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा” अशी मागणी केली. या प्रकरणाचे पडसाद राज्यभर अनेक ठिकाणी उमटल्याचं पाहायला मिळाले होते.

दत्तात्रय भरणे महाराष्ट्राचे नवे कृषिमंत्री
इंदापूरचे आमदार आणि राज्याच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे हे महाराष्ट्राचे नवे कृषिमंत्री असतील. दत्तात्रय भरणे यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण, तसंच अल्पसंख्यांक मंत्रालयाची जबाबदारी होती. यातील क्रीडामंत्रिपदाची जबाबदारी काढून घेण्यात आली असून, ती जबाबदारी माणिकराव कोकाटेंकडे देण्यात आलीय. दत्तात्रय भरणे हे अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) काँग्रेस पक्षाच्या हर्षवर्धन पाटील यांचा पराभव करून दत्तात्रय भरणे पुण्यातील इंदापूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेत पोहोचले आहेत. दत्तात्रय भरणे इंदापूरमधून तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *