
तायक्वांदो स्पर्धेत एकूण २३ पदकांची कमाई
मुंबई ः नेरुळ (नवी मुंबई) येथे प्रथमच हिरा तायक्वांदो अकादमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिरा’स तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेत लालबाग, परळ मधील स्पोर्ट्स व रोहित अकादमीच्या खेळाडूंनी २३ पदके पटकावून शानदार यश मिळवले.
ही स्पर्धा वय वर्ष ८, १०, १२, १४, व १७ सब ज्युनियर, कॅडेट व ज्युनियर वयोगटात व वजनी गटात झाली. क्योरूगी (फाईट) आणि पूमसे (अॅक्शन परफॉरमन्स) या दोन क्रीडा प्रकारात खेळवण्यात आली. सदर स्पर्धेत लालबाग, परळ – भोईवाडा आणि अंबरनाथ परिसरातील दोन्ही अकादमीच्या २३ खेळाडूंनी भाग घेऊन २३ पैकी २३ पदके मिळवली. यात ८ सुवर्ण, ११ रौप्य आणि ४ कांस्य पदकांचा समावेश आहे. या स्पर्धेत तेजस्विनी घोरपडेला ‘बेस्ट फाईटर’ हा किताब मिळाला.
अकादमीच्या खेळाडूंनी तिसऱ्या क्रमांकाचे स्थान प्राप्त केले. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील विविध अकादमीतील खेळाडूंमध्ये ही स्पर्धा रंगली. खेळाडूंना प्रशिक्षक सुनील साखरकर, रोहित कदम यांच्यासह प्रशिक्षक संजय चंदा, अक्षय खोत यांचे मार्गदर्शन मिळाले.
सुवर्ण पदक विजेते
कार्तिकी वाघरे, आर्या पाटील, नंदिनी पासी, आकांशा पासी, तेजस्विनी घोरपडे, वैष्णवी गाडे, सोहम कणसे, लवेश बेतकर.
रौप्य पदक विजेते
सोनाक्षी मिश्रा, श्रद्धा मिश्रा, छवी जयस्वाल, काव्या लायगुडे, साक्षी कुर्मी, वेदांत पाटील, रोशनी गुप्ता, विजय गावंडलकर, तरुण कोटकल, नेत्रा सुतार, ग्रीष्मा घाडीगांवकर.
कांस्य पदक विजेते
रिद्धी पाटील, रिया मिश्रा, आदित्य अमराले, अथर्व तायडे.