
स्वाभिमान क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ प्रमोद राठोड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजन
छत्रपती संभाजीनगर ः भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते, स्वाभिमान क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ प्रमोद राठोड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या बास्केटबॉल स्पर्धेला मोठा प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत पाचशे खेळाडू सहभागी झाले होते.

या स्पर्धे दरम्यान ड्रिबल आणि शूटिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात जवळपास ५०० खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी स्वाभिमान क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि भाजप नेते डॉ प्रमोद राठोड, माजी नगरसेवक माधुरी अदवंत, स्वाभिमान क्रीडा मंडळाचे अध्यक्ष समीर लोखंडे, एन ३ एन ४ चे वॉर्ड अध्यक्ष जीवन रौंदळ, स्कोडाचे डेप्युटी जनरल मॅनेजर राजेश आंधळे, नितेश टेकाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेतील विजयी खेळाडूंना डॉ प्रमोद राठोड यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.
ड्रिबल आणि शूटींग स्पर्धेतील विजयी खेळाडू
वेदांश चांडक, तेजस घुटे, अमेय काळुशे, अस्मी डोणगावकर, पावनी सूर्यवंशी, अन्विका बांगर, पृथ्वीराज पिंजले, पवन थोरात, शर्विल कुलकर्णी, श्रावणी तुपे, अही जैन, अहाना खन्ना, रिषभ चौधरी, स्वानंद कुलकर्णी, कविष लढ्ढा, रीवा काकडे, आराध्या रामेश्वर, शौर्य जाधव, कैवल्य काळे, सात्विक जाधव, रिषब काळे, तनिष जेथलिया, रुपश्री मुंदडा, गुप्ता, कियारा परदेशी, महिराज पाटील, अधिराज, श्रेयस, कबीर हिवराळे, शौर्या परदेशी, दहेरा काकर, मिहिरा बंसल, दिशा गांधी, तनया देसरडा, श्रीशां कांकरिया, श्रेयांश तुपे, आगम ललवानी, अधिवीर म्हस्के, ऋषिका बिसेन, तनिषा गुप्ता, कियारा परदेशी, तनय गुप्ता, अर्णव पिंगळकर, ऋषभ काळे, लाभेश बागला, खियाना देलवाडिया, स्वामिनी सदांशिव, सुभिया भारुका, स्वानंद कुलकर्णी, जश अग्रवाल, मेधांश राजपूत, श्रावणी तुपे, आही जैन, प्रिशा गुप्ता, अहाना खन्ना, शर्विल कुलकर्णी, कावेश लड्डा, अमेय जाधव, श्रेया धाराशिवकर, गुंजन साने, माही कोहली, तेजस घुटे, शिवेन जेथलिया, निपुण अग्रवाल.