
संभाजीनगर जिल्हा योगासन स्पर्धा
छत्रपती संभाजीनगर ः सहाव्या जिल्हास्तरीय योगासन अजिंक्यपद स्पर्धेत आर्या जांभळे, शौर्य जांभळे, वैष्णवी शर्मा, अपेक्षा अवचरमल. ऋत्वी वाठेरे, शितल टाकले, आर्यन थोरात, उत्कर्ष बसेर, सार्थक बंगाळे, कृष्णा तोंडे, सुरज बनकर यांनी आपापल्या वयोगटात विजेतेपद संपादन केले.
गरवारे कम्युनिटी सेंटर येथे आयोजित सहाव्या जिल्हास्तरीय योगासन अजिंक्यपद स्पर्धेत १६३ खेळाडूंनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेचे उद्घाटन इंडियन आर्मीचे मेजर निरव यांच्या हस्ते झाले. यावेळी गरवारे कम्युनिटी सेंटरची संचालक सुनील सुतावणे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएशनच्या तांत्रिक अधिकारी छाया मिरकर यांची उपस्थिती होती.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ छत्रपती संभाजीनगर जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ गजानन सानप, छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे एचआर अनिल तायडे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएशनचे सचिव सुरेश मिरकर यांच्या हस्ते झाला.
या स्पर्धेतून निवड झालेल्या खेळाडूंची १५ ते १८ ऑगस्ट या कालावधीत संगमनेर येथे तर २९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या सीनियर राज्यस्तरीय योगासन अजिंक्यपद स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड करण्यात आली आहे.
जिल्हास्तरीय स्पर्धेत पंच म्हणून छाया मिरकर, कोमल सुरडकर, पवन बोर्डे, मंदाकिनी जगताप, पूजा सदावर्ते, योगिनी पाटील, अंजली देशपांडे, मंजुश्री गिरी, मधुकर चव्हाण, कृष्णा तोंडे, संध्या बोदेकर, श्रद्धा पाठक, हरिभाऊ पवार, प्रियंका बडक, रमाकांत रौतेले यांनी काम बघितले.
स्पर्धेतील विजयी खेळाडू
शर्वरी चव्हाण, पूजा सोनवणे, स्वास्तिका भालेराव, स्नेहल मुंडे, गुंजन काकड, शिवानी पवार, साक्षी पोखरकर, खुशबू दूरखिया, वैभवी काडवडे, कल्याणी फुरसुले, शितल टाकले, नूतन गुट्टे, शिल्पा नांदेडकर, संध्या बोधेकर, शैलजा मापारी, आर्यन थोरात, वेदांत देशमुख, सोहम बनसोडे, पार्थ कावरे, सुशांत कांबळे, माऊली वायकर, बाबासाहेब लोखंडे, ओंकार कोलते, श्रीकृष्णा तोंडे, सुरज बनकर, रविकिरण चव्हाण, सचिन धोत्रे, किमया जोशी, वेणू कुरडे, अंकिता गनकवार, अपेक्षा अवचरमल, सपना खाबाटकर, कशिश गुप्ता, जयश्री इंगळे, कल्याणी फुरसुले, रीना खोपसे, श्रद्धा पाठक, संध्या बोधेकर, गीता भोजने, प्रियम महला, शुभ्रा कुलकर्णी, अपेक्षा अवचरमल, ऋत्वी वाठोरे, माही बेंद्रे, आर्या जांभळे, शौर्य जांभळे, कशिश गुप्ता, कृषिका महाजन, सिद्धी इंगोले, पल्लवी चाटे, माही बेंद्रे, वैदाली धोत्रे, संजना सुलाने, कृशाली मोरे, वैष्णवी शर्मा, स्नेहल मुंडे, सृष्टी मुंडे, खुशबू दूरखिया, सोहम बनसोडे, दक्ष जाधव, आर्यन थोरात, हर्ष मैड, नागराज शिंदे, शंतनु बोडखे, सुशांत कांबळे, नागराज शिंदे, दक्ष जाधव, आनंद देवरे, साकिब शेख, आर्यन मानकापे, श्याम देशमुख, नवनाथ चित्रक, रविकिरण चव्हाण, सचिन धोत्रे, हरिभाऊ पवार, उत्कर्ष बसेर, हर्ष मैड, सार्थक भंगाळे, माऊली वायकर, नवनाथ चित्रक, हरिभाऊ पवार, हर्षित पुराणिक, प्रतीक तोंडे, सार्थक भंगाळे, बाबासाहेब लोखंडे, सुरज बनकर, साकिब शेख, उत्कर्ष बसेर, शंतनु बोडखे, श्रीकृष्ण तोंडे, वेदाली धोत्रे, मोनिका झोपे, तनुजा देवरे, वैभवी काडवदे, नेहा धामणे, योगिनी जाधव, नूतन गुट्टे, शुभ्रा कुलकर्णी, आरोही बहुरे, प्रणाली वाघ, वैष्णवी शर्मा, योगिनी पाटील, मंजुश्री गिरी, आराध्या पाटील, शौर्य जांभळे, जयश्री इंगळे, रीना खूपसे, श्रद्धा पाठक, गीता भोजने, स्वस्तिका भालेराव, तनुजा देवरे. कृष्णिका महाजन, मंजुश्री गिरी, रूतवी वाठोरे, आर्या जांभळे, साक्षी पोखरकर, सपना खांबाडकर, ऋतुजा वाबळे, शितल टाकले, शिल्पा नांदेडकर, सुलभा चव्हाण.