
मुंबई ः सतराव्या सब ज्युनिअर मुंबई जिल्हा अजिंक्यपद तलवारबाजी स्पर्धेत रायन इंटरनॅशनल स्कूल आणि छबिलदास इंटरनॅशनल स्कूल या संघांनी आपापल्या गटात विजेतेपद पटकावले.
शिशुवन स्कूल, माटुंगा येथे संपन्न झालेल्या या स्पर्धेत मुंबई शहरांमधील ९ संघांनी सहभाग नोंदवला होता आणि ७० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय खेळाडू तलवारबाजी वैभवी इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर मुंबई फेन्सिंग असोसिएशनचे सचिव राहुल वाघमारे, शिशुवन विद्यालयाच्या क्रीडा शिक्षक निलेश बनसोडे व राष्ट्रीय खेळाडू शांताराम नाईक, खेलो इंडिया पदक विजेती अहमतुला हरणेसवाला, स्नेहा मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.
या स्पर्धेत पंच म्हणून आनंद वाघमारे, समृद्धी पाटील, विनोद जगताप, मुकीलन सी, तमन्ना मॅडम आणि निलेश मस्करे यांनी काम पाहिले. जिल्हा अजिंक्य स्पर्धेमधून विजेते खेळाडूंची येत्या ८ व ९ ऑगस्ट या दरम्यान हिंगोली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड झाली आहे.

अंतिम निकाल
मुली सर्वसाधारण विजेतेपद
प्रथम क्रमांक – रायन इंटरनॅशनल स्कूल
द्वितीय क्रमांक – गोयंका ग्लोबल स्कूल
तृतीय क्रमांक – छबिलदास इंटरनॅशनल स्कूल
मुले सर्वसाधारण विजेतेपद
प्रथम क्रमांक – छबिलदास इंटरनॅशनल स्कूल
द्वितीय क्रमांक – सावरकर फेन्सिंग क्लब
तृतीय क्रमांक – पुरस्कार स्पोर्ट्स अकॅडमी