
सोलापूर ः राज मेमोरियल इंग्लिश स्कूल व सोलापूर चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या ८८व्या जयंतीनिमित्त १९, १३ व ९ वर्षांखालील गटाच्या जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन १० ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता सुशील रसिक सभागृह, सूर्या हॉटेल जवळ, मुरारजी पेठ येथे केले आहे.
१९ वर्षांखालील गटातील प्रथम येणाऱ्या चार मुले व मुलींची निवड नांदेड येथे होणाऱ्या तर १३ वर्षाखालील २ मुले व मुलींची निवड कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे. १ जानेवारी २००६ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेले खेळाडू सहभाग घेऊ शकतात. निवड झालेल्या प्रत्येक खेळाडूंना १ हजार रुपये, मेडल व विष्णुपंत तात्यासाहेब कोठे स्मृती चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
या स्पर्धेत एकूण २५ हजार रुपयांपर्यंतचे चषक, मेडल्स व रोख बक्षिसे देण्यात येणार अशी माहिती राज मेमोरियल इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा यांनी दिली. निवड झालेल्या सर्व खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेची प्रवेश फी रक्कम देण्यात येणार असून आयोजकांकडून निवासाची व्यवस्था मोफत करण्यात आल्याबाबातची माहिती संस्थेचे सचिव व आंतरराष्ट्रीय पंच सुमुख गायकवाड यांनी सांगितले आहे. इच्छुक खेळाडूंनी अधिक माहितीसाठी उदय वगरे (8888045344), प्रशांत पिसे (9156815963) अथवा अतुल सोनके 9657948949 यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन सोलापूर डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशनचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील व सोलापूर चेस अकॅडमीचे अध्यक्ष महेश धाराशिवकर यांनी केले आहे.