
नवी दिल्ली ः नामधारी एफसीने १३४ व्या ड्युरंड कप फुटबॉलमध्ये विजयी घोडदौड सुरू ठेवली आणि भारतीय हवाई दलाचा ४-२ असा पराभव केला. संघ अ गटात अव्वल स्थानावर पोहोचला आहे.
विवेकानंद युवा भारती स्टेडियमवर झालेल्या सामन्यात एअर फोर्सकडून पहिला गोल ७ व्या मिनिटाला सॅम्युअलने केला. त्यानंतर क्लॅडसन (पेनल्टी, ३७ व्या मिनिटाला), अमनदीप (४५ व्या मिनिटाला) आणि दुसऱ्या हाफमध्ये धरमप्रीत (६० व्या मिनिटाला) आणि पर्यायी खेळाडू सेलिंगथांग (७४ व्या मिनिटाला) यांनी नामधारीला ४-१ अशी आघाडी मिळवून दिली. एअर फोर्सकडून दुसरा गोल ७८ व्या मिनिटाला संकेतने केला पण हा गोल संघाला परत मिळवून देऊ शकला नाही.