< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); श्रीशंकरने कझाकस्तानमध्ये पटकावले सुवर्णपदक  – Sport Splus

श्रीशंकरने कझाकस्तानमध्ये पटकावले सुवर्णपदक 

  • By admin
  • August 4, 2025
  • 0
  • 5 Views
Spread the love

नवी दिल्ली ः प्रदीर्घ दुखापतीतून परतणाऱ्या अनुभवी भारतीय लांब उडीपटू मुरली श्रीशंकरने कझाकस्तानमधील अल्माटी येथे झालेल्या कोसानोव्ह मेमोरियल अॅथलेटिक्स मीटमध्ये अव्वल स्थान मिळवत सलग तिसऱ्या स्पर्धेत विजेतेपद पटकावले. २६ वर्षीय या खेळाडूने वर्ल्ड अॅथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर ब्रॉन्झ लेव्हल (कॅटेगरी सी) मीटमध्ये पहिल्याच प्रयत्नात ७.९४ मीटर उडी मारून विजेतेपद मिळवले.

त्याचे इतर प्रयत्न ७.७३ मीटर, ७.५८ मीटर, ७.५७ मीटर, ७.८० मीटर आणि ७.७९ मीटर होते. त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी ८.४१ मीटर आहे. गुडघ्याच्या दुखापतीतून परतल्यानंतर श्रीशंकरची ही तिसरी स्पर्धा होती. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्याला ही दुखापत झाली. त्यासाठी त्याने शस्त्रक्रिया केली होती, त्यानंतर पॅरिस ऑलिंपिकसाठी पात्रता मिळवूनही तो सहभागी होऊ शकला नाही.

सिनियर नॅशनल चॅम्पियनशिपसाठी सज्ज
दोन वेळा आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकणारा शॉटपुट अॅथलीट तजिंदरपाल सिंग इंडियन ग्रांप्रीच्या तिसऱ्या टप्प्यात अव्वल स्थान पटकावत चेन्नई येथे होणाऱ्या आंतरराज्य वरिष्ठ राष्ट्रीय चॅम्पियनशिपसाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले. ३० वर्षीय तूरने गुरु नानक स्टेडियमवर १८.९३ मीटर अंतरापर्यंत ‘लोखंडी चेंडू’ फेकला. यामुळे २० ते २४ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या चेन्नई स्पर्धेसाठी तो चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या टोकियो वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी ही शेवटची पात्रता स्पर्धा असेल.

हांगझोऊ आशियाई खेळांमध्ये पदक विजेती तामिळनाडूची विद्या रामराज हिने महिलांच्या ४०० मीटर अडथळ्यांचे विजेतेपद जिंकले तर महाराष्ट्राच्या सर्वेश अनिल कुशारे हिने पुरुषांच्या उंच उडीमध्ये सहज विजय मिळवला. राजस्थानचा उदयोन्मुख भालाफेकपटू यशवीर सिंग ७७.७९ मीटरच्या प्रयत्नाने प्रथम क्रमांकावर राहिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *