सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनच्या प्रभारी सरचिटणीसपदी उमाकांत गायकवाड

  • By admin
  • August 4, 2025
  • 0
  • 145 Views
Spread the love

सोलापूर ः सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनच्या प्रभारी सरचिटणीसपदी उमाकांत तिप्पण्णा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांची नियुक्ती करण्यात आली. मावळते सरचिटणीस ए बी संगवे यांनी त्यांच्याकडे सरचिटणीस पदाचा कार्यभार सुपूर्द केला. या बैठकीत यंदाच्या वर्षात जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजक व स्थळ ठरविण्यात आले. पुरुष व महिला स्पर्धा उत्कर्ष क्रीडा मंडळ, कुमार व मुली स्पर्धा किरण स्पोर्ट्स क्लब तर किशोर व किशोरी स्पर्धा श्री छत्रपती शिवाजी विद्यालय वीट (ता.करमाळा) यांनी आयोजित करावे असे ठरले.
तसेच या बैठकीत विशेष निमंत्रित सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. प्राचार्य रवींद्र चव्हाण, गुलाम मुजावर, सुरेश खुर्द भोसले, पुंडलिक कलखांबकर, शिवशंकर राठोड, विनोद ढेरे (करमाळा) व संदीप ठोंगे (बार्शी) या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *