
छत्रपती संभाजीनगर ः श्री छत्रपती जिमखाना जिम्नॅस्टिक सेंटर विभागीय क्रीडा संकुल येथील तीन खेळाडूंची ८ ते १० ऑगस्ट या कालावधीत देहरादून (उत्तराखंड) येथे होणाऱ्या राष्ट्रीय ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या निवडीबद्दल क्रीडा उपसंचालक शेखर पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. रणवीर पवार, जिगिषा जगदाळे, प्रियल ओस्तवाल या खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी शिवछत्रपती पुरस्कार विजेते अंजली मोहरीर, डॉ रणजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.