
मुंबई ः मुंबई उपनगर जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय निवड चाचणी ३ ऑगस्ट रोजी भांडुप येथील रोलेक्स टर्फ येथे पार पडली.
या निवड चाचणी प्रसंगी मुंबई विभाग व मुंबई उपनगर जिल्हा सचिव संदीप पाटील, राकेश सोळंकी, विजय सर, राज साहू, राजेंद्र सर व मानस पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली निवड चाचणी पार पाडली. या निवड चाचणीतून निवडलेला मुंबई उपनगर जिल्हा संघ अकलूज (सोलापूर) येथे पार पडणाऱ्या राज्य स्पर्धेत भाग घेणार आहे.