
सचिव हेमेंद्र पटेल यांची माहिती
छत्रपती संभाजीनगर ः महाराष्ट्र राज्य सब ज्युनियर (१५ वर्षांखालील) खुली आणि मुलींची निवड फिडे रेटेड बुद्धिबळ स्पर्धा छत्रपती संभाजीनगर येथे १५ ते १७ ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
शतरंज रायझिंग स्टार्स आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना आणि आखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या मान्यतेने होत आहे. राज्य बुद्धिबळ स्पर्धा बीड बायपास रोडवरील वासंती मंगल कार्यालय या ठिकाणी होणार आहे. दिग्विजय इंडस्ट्रीज (छत्रपती संभाजीनगर) यांनी स्पर्धेचे प्रायोजकत्व स्विकारले आहे.
या स्पर्धेत पहिल्या १० खेळाडूंना रोख पारितोषिक, ४० ट्रॉफेज आणि ५० मेडल्स देण्यात येणार आहेत. एकूण रोख पारितोषिके ४८ हजार रुपयांची असणार आहेत. २५० खेळाडूंचा सहभाग या स्पर्धेत अपेक्षीत आहे. प्रत्येक जिल्ह्याचे ४ मुले आणि ४ मुली प्रतिनिधित्व करणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव हेमेंद्र पटेल, महिला आंतरराष्ट्रीय मास्टर तेजस्विनी सागर, विकास पालांडे, उमेश जहागिरदार, अजय पटेल, सीनियर ऑर्बिटर विलास राजपूत, मिथुन वाघमारे, मनोज विश्वासे, मंगेश कदम, सिया सागर हे स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.