
छत्रपती संभाजीनगर जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघटनेचा वर्धापन दिन मराठवाडा सांस्कृतिक मंडळ या ठिकाणी मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. ५ ऑगस्ट १९८५ साली सुधीर दादा जोशी यांनी जिम्नॅस्टिक्स खेळाचे प्रशिक्षण वर्ग मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या खुल्या रंगमंचावर सुरू केले. ५ ऑगस्ट रोजी या प्रशिक्षण वर्गाची सुरुवात होऊन तब्बल ४० वर्षे पूर्ण झाली आहेत.
जिम्नॅस्टिक खेळातील छत्रपती संभाजीनगरच्या बारा खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पदक विजेती कामगिरी केलेली असून संघटनेने जिल्ह्याला ३८ शिवछत्रपती पुरस्कारार्थी, १०० हून अधिक आंतरराष्ट्रीय खेळाडू व २५० हून अधिक राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू संघटनेने घडवले. वर्धापनादिनानिमित्त संघटनेने आंतरराष्ट्रीय पंच परीक्षेत उत्तीर्ण झालेले तसेच राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी झालेले खेळाडू पंच व प्रशिक्षक यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच संघटना प्रत्येक वर्षी सुधीरदादा जोशी स्मृतीप्रित्यर्थ व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. या मालिकेत व्याख्यान करण्याकरिता तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रिकेट संघटनेचे माजी कोषाध्यक्ष किरण प्रभाकर जोशी हे लाभले आहेत. या कार्यक्रमाचे नियोजन संघटनेचे अध्यक्ष डॉ आदित्य जोशी यांनी केले आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळ सभागृहात मंगळवारी (५ ऑगस्ट) सायंकाळी सहा ते आठ या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमात उत्तराखंड येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत एरोबिक जिम्नॅस्ट आर्या शहा, स्मित शहा, रामदेव बिराजदार, उदय मढेकर, अभय उंटवाल, विश्वेश पाठक, अनिकेत चौधरी, पार्थेश मार्गपवार, दीपक अर्जुन, श्रीपाद हराळ, संदेश चिंतलवाड, मानसी देशमुख, साक्षी डोंगरे, गौरी ब्राह्मणे, ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स खेळाडू रिद्धी जैस्वाल, शुभम सरकटे, कलात्मक जिम्नॅस्टिक्स खेळाडू रिद्धी हत्तेकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
तसेच आंतरराष्ट्रीय पंच डॉ मकरंद जोशी, सिद्धार्थ कदम, प्रवीण शिंदे, रोहित रोंघे, संजय मोरे, प्रशिक्षक हर्षल मोगरे, ईशा महाजन, पंच अमेय जोशी, रणजित पवार यांचा गौरव करण्यात येणार आहे.