< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); आंतरराष्ट्रीय एन्ड्युरन्स स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड – Sport Splus

आंतरराष्ट्रीय एन्ड्युरन्स स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड

  • By admin
  • August 5, 2025
  • 0
  • 24 Views
Spread the love

आठ राज्यातील ४५० स्केटर्सचा सहभाग

पुणे ः एन्ड्युरन्स इंडिया व एन्ड्युरन्स महाराष्ट्र एसोसिएशनतर्फे एन्ड्युरन्स नॅशनल चॅम्पियनशिपचे यशस्वी आयोजन करण्यात आले. नोव्हेंबर महिन्यात पुणे येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय एन्ड्युरन्स स्पर्धेसाठी ही राष्ट्रीय निवड चाचणी आयोजित करण्यात आली होती. या राष्ट्रीय एन्ड्युरन्स स्पर्धेतील विजयी खेळाडूंची निवड आंतरराष्ट्रीय एन्ड्युरन्स स्पर्धेसाठी भारतीय संघात झाली आहे. 

एन्ड्युरन्स इंटरनॅशनल चॅम्पिअनशिप २२ आणि २३ नोव्हेंबर २०२५ रोजी पुणे येथे संपन्न होईल. मुंबई जवळील रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील याक पब्लिक स्कूल येथे ही राष्ट्रीय एन्ड्युरन्स स्पर्धा संपन्न झाली. या राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेत ८ राज्यातील ४५० खेळाडूंनी सहभाग घेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके जिंकून भारतीय संघात आपले स्थान निश्चित केले. 

महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगाना, गोवा, या राज्यातील उत्कृष्ट एंड्युरंस खेळाडूंनी ह्या स्पर्धेत सहभाग नोंदविला. एन्ड्युरन्स खेळ प्रकारातील एकूण ५ स्पर्धा प्रकारात व क्वाड व इनलाईन श्रेणीमध्ये व एकूण ९ वयोगटात ही राष्ट्रीय एन्ड्युरन्स  निवड चाचणी स्पर्धा संपन्न झाली. एन्ड्युरन्स इंडिया द्वारा प्रमाणित व अधिकृत राष्ट्रीय रेफरी टीमने ही राष्ट्रीय एन्ड्युरन्स स्पर्धा पार पाडली.


सर्व विजयी खेळाडूंना सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांनी सम्मानित करण्यात आले व सर्व सहभागी स्केटर्सना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. स्पर्धेच्या मुख्य पंचाची जबाबदारी दशरथ बंड व ध्वनित रेले यांनी पार पाडली. एन्ड्युरन्स खेळाचे जनक व संस्थापक तसेच एन्ड्युरन्स वर्ल्डचे अध्यक्ष योगेश कोरे, एन्ड्युरन्स इंडियाचे अध्यक्ष संदीप सोलंकी, कोषाध्यक्ष मनोज ठाकरे, व एन्ड्युरन्स इंडियाच्या सर्व राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित संपूर्ण स्पर्धा व स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.

स्पर्धेचे समालोचन व पुरस्कार वितरण समारंभाचे संचालन रवींद्र मिसाळ व सतीश सिंग यांनी केले. या राष्ट्रीय एन्ड्युरन्स स्पर्धेसाठी पुण्यातील प्रसिद्ध जिविषा पेनमैनेजमेंट क्लिनिक चे वैद्यकीय व प्रथमोपचाराचे सहकार्य लाभले. पी फ्लो या स्पर्धेची क्रिएटिव्ह पार्टनर होती.

भारतीय संघात निवडीसाठी घेण्यात आलेल्या या राष्ट्रीय एन्ड्युरन्स निवड चाचणीच्या यशस्तीवितेसाठी शाम चौधरी, अफझल शेख, कुणाल बेले, जय सिंग, संदीप माने, अक्षय कांबळे, दीपक सागर, निखिल बावकर, शब्बीर शेख, विशाल तुपे, हेमंत पाटणकर, राजा प्रसाद, भारती कोळी, भाग्यश्री दशपुत्रे यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *