महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनच्या विभागीय सचिवपदी सतीश पाठक  

  • By admin
  • August 5, 2025
  • 0
  • 174 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनची सर्वसाधारण सभा नागपूर येथील आमदार निवासात पार पडली. या सभेमध्ये भारतीय क्रीडा विकास संहिता -२०११ नुसार राज्य व्हॉलीबॉल संघटनेच्या पदाधिकाऱ्याची निवडणुकीद्वारे निवड करण्यात आली. निवडलेल्या महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनच्या संचालक मंडळाचा कालावधी २०२५ ते २०१९ असा राहील.

या संचालक मंडळात प्रमुख आश्रयदाते म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अध्यक्ष म्हणून विजय डांगरे, चेअरमन संजय नाईक, कार्यकारी अध्यक्ष अनुप पोटे, सचिव प्रा निलेश जगताप, सहसचिव अरविंद गवई व कोषाध्यक्ष सुनील हांडे यांची बहुमताने निवड करण्यात आली.

या सभेमध्ये छत्रपती संभाजीनगर विभागीय सचिव म्हणून सतीश पाठक यांची एकमताने निवड करण्यात आली. सतीश पाठक हे व्हॉलीबॉलचे राष्ट्रीय खेळाडू असून बऱ्याच वर्षांपासून व्हॉलीबॉल जिल्हा संघटनेमध्ये कार्यरत आहेत. सतीश पाठक यांचे विभागीय व्हॉलीबॉल सचिव म्हणून निवड झाल्याबद्दल मोईन कादरी, सय्यद रफत, उमेश शिंदे, प्रवीण शिंदे, सोमनाथ टाक, सोमनाथ पचलूरे, विजयकुमार शिंदे, एकनाथ साळुंखे, नारायण शिंदे, गणपत पवार, रोहित पाटील, विलास राजपूत, ज्योती दांडगे, जगन्नाथ अधाने व प्रफुल कुलकर्णी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *